अरे देवा! `या` देशात डेल्टापेक्षाही कोरोनाचा घातक व्हायरस, भारतालाही धोका?
या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. नव्या व्हेरियंटमुळे WHO सह अनेक देशांची झोप उडालीय.
मुंबई : आता कुठे जग कोरोनाच्या संकटातून थोडा मोकळा श्वास घेतोय. त्यात आता दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. नव्या व्हेरियंटमुळे WHO सह अनेक देशांची झोप उडालीय. हा नवा व्हेरियंट B.1.1.529 प्रंचड घातक असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.किती खतरनाक आहे हा नवा व्हेरियंट जाणून घेऊयात. (corona new Variant found in south africa)
B.1.1.529 या व्हेरियंटनं स्वतःला तब्बल 30 वेळा बदललं आहे.त्यामुळे तो जास्त संसर्गजन्य आणि घातक झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून भारतात परतणाऱ्या भारतीयांची काटेकोर कोरोना तपासणी केली जाणार आहे.
सध्याच्या लसी या व्हायरसवर प्रभावी आहेत का, याचाही अभ्यास सुरू आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनाही सजग झाली आहे. डबल्यूएचओने या नव्या व्हेरियंटसंदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे.
हा नवा व्हेरियंट किती वेगानं पसरू शकतो, याचा अजून अंदाज आलेला नाही. आतापर्यंत समोर आलेल्या अल्फा, डेल्टापेक्षाही कित्येक पटीनं घातक आणि सतत स्वतःला बदलत राहणारा हा आफ्रिकेचा व्हायरस आहे. त्यामुळे अख्ख्या जगानं आता या नव्या व्हेरियंटचं टेन्शन घेतलंय. त्यामुळे तुम्हीही खबरदारी घ्या आणि कोरोनाचे नियम पाळा.