मुंबई : जगभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या 64 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3 लाख 85 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या 18 लाख 50 हजारांहून अधिक झाली आहे. तर 1 लाख 7 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अहवालानुसार अमेरिकेत 18.51 लाख, ब्राझीलमध्ये 5.84 लाख, रशियामध्ये 4.31 लाख, युनायटेड किंगडममध्ये 2.81 लाख, स्पेनमध्ये 2.40 लाख, इटलीमध्ये 2.33 लाख, भारतात 2.16 लाख, जर्मनीत 1.84 लाख, पेरूमध्ये 1.78 लाख. टर्कीमध्ये 1.66 लाख तर ईराणमध्ये 1.60 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


कोरोनामुळे, अमेरिकेत 1.07 लाख, युनायटेड किंगडमध्ये सुमारे 40 हजार, इटलीमध्ये 33 हजार, ब्राझीलमध्ये 32 हजार, फ्रान्समध्ये 29 हजार, स्पेनमध्ये 27 हजार, मेक्सिकोमध्ये 11 हजार, बेल्जियममध्ये 9522, जर्मनीमध्ये 8602, इराणमध्ये 8012, कॅनडामध्ये 7579, भारतात 6088, नेदरलँडमध्ये 5996 तर रशियात 5202 लोकांचा मृत्यू झाला आहे.


ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढून 39 हजार 728 झाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 2 लाख 79 हजार 856 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी स्पेनमध्ये कोरोनामुळे कोणतीही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. स्पेनमध्ये आतापर्यंत  27 हजार 127 लोकांचा मृत्यू झाला आहे.