Video: कोरोना रुग्ण घरात लपून बसला होता, प्रशासनानं क्रेननं खेचून काढलं बाहेर आणि...
गेल्या काही दिवसात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patient) वाढ होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. प्रशासनानं वुहानमधील काही भागात लॉकडाउन (Lockdown) जाहीर केलं आहे.
Corona Patient Pulled Out By Crane: जगभरात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून नियम शिथिल करण्यात आले आहेत. चीनमधून उगम पावलेल्या कोरोनानं बघता बघता संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतल होतं. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना लसीकरणानंतर कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र गेल्या काही दिवसात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patient) वाढ होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. प्रशासनानं वुहानमधील काही भागात लॉकडाउन (Lockdown) जाहीर केलं आहे. चीनमधील एका शहरातील व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video on Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. कोरोना झाल्यानंतर सदर व्यक्ती घरात लपून बसली होती. पण प्रशासनानं रुग्णाला क्रेनच्या मदतीने घरातून बाहेर काढण्यात आलं आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीला क्रेनला बांधलेलं आहे. सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं बोललं जात आहे. कोरोना होऊनही सदर व्यक्ती घरातून बाहेर येत नव्हती. त्यानंतर प्रशासनानं घरी जाऊन त्याला क्रेनच्या मदतीने बाहेर काढलं. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
चीनमधील एका प्रसिद्ध लेखकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चीनमधील कोणत्या भागातील आहे याबाबत स्पष्टता नाही. व्हिडीओ शेअर करताना लेखकाने लिहिले की, क्रेनने कोरोना रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये नेण्यात आले. कोरोनाबाबत चीन सरकारकडून शून्य कोविड धोरण अवलंबले जात आहे.