कोरोना व्हायरस : विकसित देशांमध्ये मृत्यूचं तांडव
कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा जगभरात अजूनही वाढतोय आणि मृत्यूचं प्रमाण देखील वाढत जात आहे.
मुंबई : कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा जगभरात अजूनही वाढतोय आणि मृत्यूचं प्रमाण देखील वाढत जात आहे. भारतात आतापर्यंत ५ हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनामुळे १४९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४१० लोकं बरे झाले आहेत. मात्र विकसित देशांमध्ये या पेक्षा भयावह परिस्थिती आहे.
अमेरिकेत मृत्यूचा आकडा वाढला
अमेरिकेत संसर्ग झालेले रूग्ण सर्वाधिक आहेत. अमेरिकेत ४ लाख ३० हजार ३७६ लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना व्हायरसने १४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
इटलीत १७ हजार मृत्यू
इटलीमध्ये कोरोना व्हायरस संसर्गामुळे आतापर्यंत १७ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. इटलीत आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४२२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
स्पेनमध्ये संसर्गाचा आकडा वाढला
स्पेन या देशाला देखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. स्पेनमध्ये देखील बळींचा आकडा १४ हजाराच्या पुढे गेला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत १ लाख ४८ हजार २२० लोकांना लागण झाली आहे.
बिटनमध्ये देखील आकडा वाढतोय...
ब्रिटनमध्ये बुधवारी सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये एका दिवसात ९०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाने बळींची संख्या ७ हजार ९७ वर पोहोचली आहे.
फ्रान्समध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढणार
फ्रान्समध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढणार आहे. कारण रूग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. फ्रान्समधील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढवण्यात आलं आहे.