Corona Virus News : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने (Corona Outbreak in China) आपला रौद्र अवतार दाखवला आहे. कोविड-19 (Covid-19) निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये पुन्हा एकदा या संकटाने आपले हातपाय पसरवले आहेत. शवगृहात बघावं तिकडे मृतांचा खच पडला आहे. चीनमधील कोरोनाचा महासंकट भारत, जपान, थायलंड आणि अमेरिकेकडेही वळलं आहे. अशातच चीनची बेपर्वाई पुन्हा एकदा समोर आली आहे. यावेळी चीनने हद्दपार केली आहे. कारण कम्युनिस्ट सरकारने देशाच्या सर्व सीमा खुल्या केल्या आहेत. 


या देशांना सर्वाधिक धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनने तीन वर्षांपासून बंद असलेल्या सर्व सीमा खुल्या केल्या आहेत. रविवारी हाँगकाँग आणि मुख्य भूप्रदेश चीन दरम्यान प्रवाशांनी स्थलांतरन करण्यात आलं. धोकादायक म्हणजे या लोकांसाठी क्वारंटाईनसारखा मोठा प्रोटोकॉलही रद्द केला. या निर्णयामुळे भारतासह जपान, थायलंड, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका निर्माण झालाय. (Corona Virus News China corona virus outbreak china all borders were opened because lunar new year of china  marathi news)


का घेतला हा निर्णय?


चीनने असा धोकादायक निर्णय का घेतला असा प्रश्न जगाला पडला आहे. चीनने हा निर्णय घेण्यामागे चंद्र नववर्ष हे कारण आहे. 21 जानेवारीपासून चंद्र नववर्ष सुरु होणार आहे. त्यापूर्वी चीनने एकीकडे चीनमध्ये कोरोना बळींची संख्या हजारावर गेलीय. लोकांचे मृतदेह ट्रकभरून स्मशानभूमीत नेले जातायत, असे व्हिडिओ समोर येतायत. अशात, चीनच्या बेपर्वा निर्णयांमुळे जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात येण्याची भीती निर्माण झालीय. 


चायनीज चंद्र नववर्षाला पुन्हा कोरोनाचा उद्रेक?


'चुन युन'चा पहिला दिवस म्हणजेच चंद्र नववर्षला शनिवारी चीनमध्ये सुरू झाला. चुन युन या दिवशी जगातील सर्वात मोठं वार्षिक स्थलांतर होतं. तसं तर  चंद्र नववर्षला 21 जानेवारीपासून सुरू होईल. या 40 दिवसांमध्ये अख्खा चीनमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. त्यामुळे या सुट्टीमध्ये लोक पर्यटनासाठी प्रवास करतात. 2020 नंतर देशांतर्गत प्रवास निर्बंधांशिवाय हे पहिले चंद्र नववर्ष असेल. एकीकडे कोरोनाचा हाहाकार सुरु असताना या दिवसांमध्ये लोकांचा प्रवास मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे जगभरात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 


भारतात सध्या कोरोनाची स्थिती 


गेल्या एका आठवड्यात भारतात कोरोनाचे 1 हजार 377 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यात 16 जणांचा बळी गेले आहेत.तर आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात 2 हजार 509 सक्रिय रुग्ण आहेत.