मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. स्पेनमध्ये एका दिवसात ८३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ५,६९० जणांना जीव गमवावा लागला. स्पेनच्या ९ हजारांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या ९,१३४ एवढी झाली आहे. तर ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा १ हजाराच्या वर गेला आहे. ब्रिटनने एका दिवसात त्यांचे २६० नागरिक गमावले आहेत. जगभरात कोरोनाचे ६,१५, ६७५ पेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत २८,३१५ जणांचा मृत्यू झाला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या बाहेर कोरोनाचे ५,३४,२८० रुग्ण समोर आले आहेत. एकट्या अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,०३,५९५ एवढी झाली आहे. कोरोना आतापर्यंत २०२ देशांमध्ये पोहोचला आहे. कोरोनाचे २१.८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 



भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९०० पर्यंत पोहचली आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा १८६ पर्यंत गेला आहे. आज दिवसभरात नव्याने २८ रुग्ण आढळले. राज्यात कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे.