कोरोनाबाबत आणखी एक खुलासा, अपेक्षेपेक्षा दुप्पटीने होतंय संक्रमण
कोरोनामुळे जगात रुग्णांच्या संख्येत अपेक्षेपेक्षा अधिक संक्रमण
मुंबई : जगभरात कोरोना विषाणूवर अभ्यास आणि सतत संशोधन सुरु आहे. दररोज नवीन दावे पुढे येत आहेत. दररोज नवीन माहिती येत आहे. अशा परिस्थितीत हे माहित झाले आहे की कोरोना विषाणू अपेक्षेपेक्षा दुप्पट वेगाने पसरत होता. चीनच्या वुहान शहरावर केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.
यापूर्वी असे सांगितले गेले होते की कोरोना विषाणूचा संसर्ग असलेला एखादा रुग्ण सुमारे २.२ ते २.७ लोकांना संक्रमित करू शकतो. म्हणजे २ ते ३ लोकं. परंतु आता नवीन माहिती समोर येत आहे की कोरोना विषाणू संक्रमित व्यक्तीकडून ५.७ लोकांना म्हणजेच ६ लोकांना संक्रमित करु शकतो.
न्यू मेक्सिकोच्या लॉस अॅलामोस नॅशनल लॅबोरेटरीने हे संशोधन केलं आहे. या प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी वुहानमधील संसर्गाच्या पद्धतीचा अभ्यास केला आहे, अशी माहिती आहे की या शहरातून उद्भवलेला विषाणू एका माणसापासून साधारणत: अंदाजे ६ लोकांना संक्रमित करत होता.
आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १.७ दशलक्ष लोकांना याची लागण झाली आहे. परंतु विषाणूचा प्रसार सुरु होऊन पाच महिने झाले आहेत. परंतु अद्याप यावर कोणताही यशस्वी उपचार कळालेला नाही.
डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अभ्यासात असे आढळले आहे की कोरोना विषाणूची लागण झालेल्या सुमारे ८२ टक्के लोकांनी आतापर्यंत या विषाणूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित केली आहे.
यापूर्वी कोरोना विषाणूचा अभ्यास करण्यात आला होता तेव्हा तो पहिल्या ६ ते ७ दिवसांत दोन ते तीन जणांना संक्रमित करतो असं पुढे आलं होतं. पण हा दर जास्त देखील असू शकतो असं देखील सांगण्यात आलं होतं. आणि तेच आता घडतंय.
शास्त्रज्ञांना आढळले आहे की, कोरोना विषाणूमुळे संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर ४.२ दिवसांत लक्षणे दिसणे सुरू होते. तर, पूर्वी असे नोंदवले गेले होते की लक्षणे ६.२ दिवसात दिसून येत होती.
१८ जानेवारीपूर्वी चिनी रुग्णालयात दाखल झालेल्या सर्वांच्या शरीरात लक्षणे दिसण्याचे प्रमाण ५.५ दिवस होते. परंतु १८ जानेवारीपासून ही लक्षणे दर्शविण्याची सरासरी वेळ १.५ दिवसांपर्यंत कमी झाली आहेत.
लॉस अॅलामोस नॅशनल लॅबोरेटरीच्या या अभ्यासातून असे समोर आले आहे की हा विषाणू एखाद्या रूग्णाकडून आता ५ ते ६ लोकांना संक्रमित करु शकतो. म्हणजेच आधी पेक्षा तो आता दुप्पटीने पसरत आहे असं समोर आलं आहे.