हाँगकाँग : चीनमध्ये नव्या व्हेरियंटच्या रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे तिथं पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ आलीय. येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. 2020 पेक्षाही सर्वात वाईट परिस्थिती आता चीनवर ओढवलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या अनेक भागांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी लोकांमध्ये मारामारी होत आहेत. वैद्यकीय साधनांचा तुटवडा जाणवत आहे. क्वारंटाईनसाठी जागा शिल्लक नाही. तर, संपूर्ण चीनमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकाच वैद्यकीय साठा शिल्लक आहे.


कोरोना बाधितांच्या या संख्येत अचानक वाढ होऊ लागल्यानं WHO ने साऱ्या जगाला धोक्याचा इशारा दिलाय. चीनमधील जिलिन हे शहर कोरोनामुळे प्रभावित झालंय. येथील आरोग्य सेवांवर तणाव वाढत आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांना स्वतंत्र वेगळे ठेवण्याची व्यवस्था नाही.


कोरोनामुळे इतकी परिस्थिती बिघडली की स्मशानभूमीमध्ये एक महिन्याचे वेटिंग आहे. लाखो लोक घरात कैद झाले आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक चेन झेंगमिन यांनी सांगितले की, वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये वृद्धांना बूस्टर डोस देण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत चीनमधील परिस्थिती आणखीन बिघडेल.