मुंबई : चीन (China)च्या वुहान (Wuhan) शहरातून कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण सुरू झाली. जागतिक साथीचा रोग म्हणत या कोरोना व्हायरस आतापर्यंत १४० देशांमध्ये प्रवेश केला आहे. याचदरम्यान वैश्विक महामारी बनलेल्या कोराना व्हायरसची लागण झालेला जगातील पहिला रूग्ण सापडला आहे. परदेशी मीडियाच्या दाव्यानुसार, ५७ वर्षांत्या वेई गायक्सियन असं या महिलेचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन वृत्तपत्र 'वॉल स्ट्रीट जनरल'च्या माहितीनुसार वेई गायक्सियन यांना कोरोना व्हायरसची लागण सर्वात प्रथम झाली त्यामुळे त्यांना 'पेशंट झिरो' या नावाने ओळखलं जातं. अशी व्यक्ती ज्यामुळे रोगाची लक्षण सर्वात पहिली सापडली. 


रिपोर्टनुसार वेई यांचा चीनमधील वुहानमध्ये मासळी बाजारात कोळंबी विकण्याचा व्यवसाय आहे. १० डिसेंबर २०१९ रोजी त्यांना सर्वात प्रथम सर्दी आणि तापाची लक्षण दिसून आली. सुरूवातीला हा ताप अगदी सामान्य वाटत होता. सुरूवातीला त्यांनी स्थानिक रूग्णालयात दाखवलं. मात्र त्यांना त्याचा काही फार फरक पडला नाही. 


त्यानंतर त्या वुहानमधील इलेव्हथ हॉस्पिटलमध्ये गेल्या मात्र तेव्हाही त्यांचा त्रास काही कमी झाला नाही. १६ डिसेंबरला वेई वुहानमधील सर्वात मोठ्या युनियन हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यावेळी तिथे त्यांच्याप्रमाणेच लक्षणे असलेली मासळी मार्केटमधील अनेकजण त्या रूग्णालयात गेले होते. तोपर्यंत मासळी बाजारात अनेकांना याची लागण झाल्याचं दिसून आलं. डिसेंबर महिन्यातच वेई यांना क्वारंटाइन करण्यात आलं. 


मासळी बाजारात मटण विक्रेते ज्या प्रसाधनगृहाचा वापर करत होते त्याचाच वापर वेई यांनी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक महिना योग्य तो उपचार घेऊन क्वारंटाइन राहून जानेवारी महिन्यात वेई यांचा चाचणीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आणि त्या या आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या. 



सुरूवातीला कोरोना व्हायरस झालेल्या २७ रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये मासळी बाजारातील २४ जण होते. जर या महामारीच्या सुरूवातीलाच कठोर पावलं उचलली असती तर आज एवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसता, अशी माहिती वेईने मिरर UK ला दिली आहे.