वॉशिंग्टन : अमेरिका डब्ल्यूएचओपासून (World Health Organization) विभक्त, ट्रम्प सरकारने (American Government) अधिकृत पत्र पाठविले आहे. अमेरिका आता यापुढे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने डब्ल्यूएचओला या संदर्भात आपला निर्णय अधिकृत पत्राद्वारे कळविला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने WHOशी संबंध तोडल्याने डब्ल्यूएचओ आणि इतर देशांसाठी हा जबरदस्त झटका मानला जात आहे.  ट्रम्प सरकारने कोरोना व्हायरस प्रकरणात चीनच्या अंतर्गत डब्ल्यूएचओ काम करत असल्याचा आरोप केला होता. तसेच अमेरिकन सरकारने एप्रिलपासून डब्ल्यूएचओला दिलेला निधी थांबवला होता. त्याचवेळी इशारा दिला होता.



अमेरिकन माध्यमांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प सरकारने डब्ल्यूएचओकडून आपले सदस्यत्व मागे घेण्याबाबत एक पत्र पाठवले आहे. ६ जुलै २०२१ नंतर अमेरिका डब्ल्यूएचओचा सदस्य असणार नाही. १९८४ मध्ये ठरविलेल्या नियमांनुसार, कोणतेही सदस्यत्व मागे घेतल्याच्या एक वर्षानंतर, डब्ल्यूएचओमधून तो देश बाहेर पडू शकतो. त्यामुळे अमेरिकेचे सदस्य आता एक वर्षानंतर संपुष्टात येणार आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेला डब्ल्यूएचओचे सर्व थकबाकी परतफेड करावी लागणार आहे.


अमेरिकन सिनेटचा सदस्य रॉबर्ट मेनेंडेज यांनी ट्विट करुन अधिकृत दुजोरा दिला आहे. WHOपासून विभक्त होण्याबाबत अमेरिकेकडून माहिती मिळाली आहे. ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे अमेरिका आजारी आणि एकाकी होईल, असे ते म्हणाले.


 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती. WHOला देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम रोखण्याची तातडीने अंमलबजावणी केली गेली. अमेरिकेचा आरोप आहे की डब्ल्यूएचओने चीनमधील कोरोना विषाणूची ओळख जाणूनबुजून साथीचा रोग जाहीर करण्यात उशीर केला. त्याचवेळी, डब्ल्यूएचओने चीनी सरकारच्या आदेशानुसार काम सुरू केले आहे.