इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. कोरोना पॉझिटीव्हची संख्या १०००वर पोहोचली आहे. पाकिस्तानात आतापर्यंत सात जणांचा कोरोनो व्हायरसने मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.  त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. असे असताना पाकिस्तानात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलेले नाही. दरम्यान, पाकिस्तानातील वेगवेगळया प्रांतांनी परस्पराशी संपर्क बंद केला आहे.



अनेक लोक पाकिस्तानातून इराणला यात्रेसाठी गेले होते. ते मायदेशी परतल्यानंतर कोरोना व्हायरसचा फैलाव झाला. त्यामुळे पुढच्या काही दिवसात पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची  संख्या अधिकच वाढली. इराणमधून परतल्यानंतर हे नागरीक वेगवेगळया भागात विखुरले गेल्याने गेल्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 


पाकिस्तानला कोरोना फैलावाचा मोठा धोका, असा इशरा पाकिस्तानातील डॉक्टरांनी दिला आहे. कोरोनाने पाकिस्तानाही शिरकाव केल्याने धोका वाढला आहे.. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची मागणी होत आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी हे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानात कोरोनाचा मोठा धोका निर्माण होण्याचा धोका आहे. 


दरम्यान, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य रेषेखालील लोक राहतात. त्यामुळे कर्फ्यू लावणे शक्य नाही. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिल. त्यामुळे लॉकडाऊनचा पर्याय योग्य नाही. आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.