नवी दिल्ली : कोरोनापासून वाचण्यासाठी घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. देश जवळपास तीन महिने लॉकडाऊन होता. लॉकडाऊनचा उद्देश लोकांना घरांत ठेवणं हा होता, जेणेकरुन कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकेल. परंतु एका अभ्यासातून याच्या अगदी उलट बाब समोर आली आहे. बाहेरच्या तुलनेत घरात राहणाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होत असल्याचं, अभ्यासात सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनमध्ये (Centers for Disease Control and Prevention-CDC) एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, 5706 रुग्णांवर संशोधन करण्यात आलं, जे कोरोनाबाधित होते. त्यात 59000 अशा लोकांना सामिल करण्यात आलं, जे 5706 रुग्णांच्या संपर्कात आले होते. 


शोधात असं समोर आलं की, 100 पैकी केवळ दोन लोक असे होते, जे घराबाहेर कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले होते. तर 10 पैकी एका व्यक्तीला घरातच कोरोनाचा संसर्ग झाला. संक्रमित झालेल्यांमध्ये अधिकतर वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश होता. 


दक्षिण कोरिया महामारी प्रतिबंधक केंद्राचे (Korea Centers for Disease Control-KCDC) संचालक डॉ. जोंग युन क्योंग (Jeong Eun kyeong) यांच्या हवाले असं सांगण्यात आलं की, मुलांचा आणि वृद्धांचा कुटुंबातील सदस्यांशी जवळचा संपर्क होत असतो. अशा लोकांना अधिक संरक्षण किंवा मदतीची आवश्यकता असते. या सर्वेक्षणात असंही आढळलं आहे की, मुलांमध्ये कोरोना व्हायरसच्या तीव्रतेचा धोका कमी आहे.


हा सर्व्हे 20 जानेवारी ते 27 मार्चदरम्यान करण्यात आला. या दरम्यान दक्षिण कोरियामध्ये कोरोना संसर्गाची मोठी वाढ झाली होती.