एका महिलेचा 10 वेळा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तरी ही कोरोनाने मृत्यू?
कोणाच्या नशिबात काय लिहले असते हे आपण सांगु शकत नाही. परंतु आपण अनेकदा काही चमत्कार होताना पाहिले असणार, याला काय म्हणावे हे सांगणे कठीण आहे.
स्टॅनफोर्ड : कोणाच्या नशिबात काय लिहले असते हे आपण सांगु शकत नाही. परंतु आपण अनेकदा काही चमत्कार होताना पाहिले असणार, याला काय म्हणावे हे सांगणे कठीण आहे. परंतु ब्रिटनमधून अशी एक अशी घटना समोर आली आहे, ज्या बद्दलं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. येथे 55 वर्षांच्या महिलेला हर्नियाची शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे जवळपास 10 दिवस रुग्णालयात ती राहिली.
या महिलेला कोरोना प्रूफ वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु अधिकची काळजी म्हणून हे दहा दिवस तिची दररोज कोरोना चाचणी देखील केली जात होती. महिलेचा प्रत्येक रिपोर्ट निगेटिव्ह आला, परंतु दहा दिवसांनी तिचा मृत्यू झाला.
हे प्रकरण नॉर्थ स्टॅनफोर्डशायरचे आहे. जिथे डेबरा शॉ नावाच्या महिलेला रॉयल स्टोक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. या महिलेचा दहा दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर, कुटुंबातील सदस्यांना शेवटच्या भेटीसाठी बोलविण्यात आले. महिलेला कोरोना नसल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. त्या महिला रिकव्हरी दरम्यान निमोनिया झाला होता. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनीही या कुटूंबाला मिठी मारून त्यांचे सांत्वन केले होते. पण आता हे प्रकरण बदलले आहे.
निष्काळजीपणाचा आरोप
द सन डॉट यूकेच्या वृत्तानुसार, डेबरा शॉचा मुलगा म्हणाला की, नंतर आम्हाला सांगण्यात आले की माझी आई कोरोना पॉझिटिव्ह होती. हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर ती कोरोना पॉझिटिव्ह होती, तर 10 दिवसांत कोणतीही चाचणी नकारात्मक का आली? आणि जर ती सकारात्मक होती तर संपूर्ण कुटुंबाला तिच्याकडे नेऊन संपूर्ण कुटुंब धोक्यात का ठेवले गेले? आता या प्रकरणात कुटुंबियांनी हॉस्पिटल विरोधात कारवाई केली आहे.