Coronavirus Latest News : जगाला संकटाच्या दरीत लोटणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गानं 2019 पासून असं काही थैमान घातलं की, आजही कोरोना म्हटलं की अनेकांच्याच चिंतेत भर पडते. दवळपास दोन वर्षांहून अधिक काळासाठी जगातील बहुतांश देशात कमीजास्त प्रमाणात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. ज्यानंतर बऱ्याच काळानं जनजीवन पूर्वपदावर आलं. अर्थात संकटं संपली नाहीत. लसीकरणामुळं कोरोनासोबत जगणं अनेकांनीच अंगाकरलं. पण, आता मात्र चिंता वाढली आहे. कारण, हा भयावह कोरोना आता पुन्हा एकदा एका नव्या रुपात परतणार असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. 


कोणाला लागली संकटाची चाहूल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या प्रसिद्ध वैज्ञानिक शी झेंगली यांनी यासंदर्भातील इशारा देत संपूर्ण जागाला आणि जागतिक स्तरावरील आरोग्य यंत्रणांना सतर्क केलं. भविष्यात कोरोना एका नव्या रुपात परतू शकतो असं सांगताना त्यासम आणखी एक संसर्ग पुन्हा एकदा जगण्याची घडी विस्कटू शकतो या शब्दांत त्यांनी सर्वांना सतर्क केलं. 



शी झेंगली या वटवाघळातून मनुष्यामध्ये संक्रमित होणाऱ्या विषाणूंचा अभ्यास करतात. ज्यामुळं त्यांना 'बॅटवुमन' असंही म्हटलं जातं. नुकतंच झेंगली यांनी त्यांच्या काही सहवैज्ञानिकांच्या जोडीनं एक संशोधन केलं. जिथं त्यांनी कोरोनासंदर्भात काही दावे केले. ज्या कोरोनानं काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर महामारीचं संकट आणलं तोच कोरोना, पुन्हा एकदा महामारीचं संकट जगावर आणू शकतो. त्यामुळं सर्वांची तयारी असणं अतीव महत्त्वाचं असा इशारा त्यांनी दिला. 


हेसुद्धा वाचा : Special Report : जंक फूड खाल्ल्यामुळं शरीर बनतं कचराकुंडी; खळबळजनक सत्य समोर 


 


खरंच परतणार कोरोना? 


2003 मध्ये समोर आलेल्या एका अहवालानुसार कोरोना आता आणखी भयंकर रुप धारण करणार असून, चीनच्या संशोधकांनी कोरोनाच्या 40 व्हेरिएंट्सचं निरीक्षण करण्याचं आवाहन जाणकारांना केलं आहे. शिवाय सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं आहे. एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या 40 व्हेरिएंट्सपैकी 6 प्रजाती अतिशय घात असून मानवामध्ये त्यामुळं संक्रमण अतिशय सहजगत्या होऊ शकतं. तर, 3 व्हेरिएंट असे आहेत की ज्यांच्या माध्यमातून श्वान, मांजरी अशा प्राण्यांच्या माध्यमातूनही हा संसर्ग पसरू शकतो.