नवी दिल्ली : चीनच्या वैज्ञानिकांनी वुहान इंन्स्टिट्युट ऑफ वायरोलॉजीच्या बायो सेफ्टी लेवल 4 मध्येच कोरोना विषाणूला तयार केले आहे. याविषयीचे पूरावे एका अभ्यासातून समोर आले आहे. 


वटवाघूळाच्या माध्यमातून कोरोना पसरला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभ्यासात म्हटले गेले की, चीनी वैज्ञानिकांनी वायरसला तयार करण्यासाठी रिवर्स इंजिनिअरिंग वर्जनने बदलण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून असं वाटावं की, विषाणू वटवाघूळातून पसरला आहे. डेली  मेलच्या बातमीच्या मते , ब्रिटिश प्रोफेसर एंगस डल्गलिश आणि नॉर्वेचे वैज्ञानिक डॉ. बिर्गर सोरेनसेन यांनी हा अभ्यास अहवाल तयार केला आहे. 


चीनमध्ये विषाणूवर रेट्रो इंजिनिअरिंगचे पूरावे


या वैज्ञानिकांनी लिहले आहे की, चीनमध्ये विषाणूवर रेट्रो इंजिनिअरिंग केली जात असल्याचे 1 वर्षाहून अधिक पूरावे आमच्याकडे आहेत. परंतू शैक्षणिक साहित्य आणि प्रमुख मासिकांनी या अभ्यासाकडे दूर्लक्ष केले आहे. प्रोफेसर डल्गलिश लंडनमद्ये सेंट जॉर्ज यूनिवर्सिटीमध्ये कॅंसरचे प्रोफेसर आहेत. ते सोरेनसेन कंपनीचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी कोरोना लस तयार करीत आहे.


अभ्यासात म्हटले गेले आहे की, वुहान लॅबमध्ये मुद्दाम डाटा नष्ट करण्यात आला. ज्या वैज्ञानिकांनी त्याविरोधात आवाज उचलला त्यांचा आवाज दाबण्यात आला किंवा त्यांना गायब करण्यात आलं.  जेव्हा आम्ही दोघे वॅक्सिन बनवण्यासाठी कोरोना सॅंपल्सचा अभ्यास करत होतो. तेव्हा विषाणूमध्ये एक विशेष ' फिंगरप्रिंट ' चा शोध लागला. 


याबाबत वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, लॅबमध्ये विषाणूसोबत छेडछाड केल्याशिवाय असं होणं शक्य नाही.