नवी दिल्ली : जवळपास नऊ महिन्यांहून अधिक काळ झाला तरीही coronavirus कोरोना व्हायरसचं थैमान काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. दिवसागणिक देशोदेशी वाढणारी कोरोना रुग्णसंख्या जागतिक आरोग्य संघटानांच्या पुढंही मोठी आव्हानं उभी करत आहे. त्यातच दुसरीकडे या विषाणूचा नायनाट करण्यासाठी लसीच्या संशोधनालाही वेग आला आहे. यातच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं खुद्द पंतप्रधानांनाच कोरोनाची लस देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE युएईचे पंचप्रधान आणि उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन रशिद अल मक्तुम यांना मंगळवारी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. त्यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये ते लस घेताना दिसत आहेत. 


'आज कोरोनाची लस घेताना आम्ही सर्वांच्या संरक्षणाची आणि चांगल्या आरोग्याची कामना करतो. युएईमध्ये लस उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या टीमचा मला अभिमान आहे. युएईमध्ये भविष्य नक्कीच आणि नेहमीच चांगलं असेल', असं ट्विट त्यांनी केलं. 



 


'अल जजीरा'च्या वृत्तानुसार शेख मोहम्मद यांना  Chinese state pharmaceutical giant Sinopharm कडून तयार करण्यात आलेली लस देण्यात आली आहे. नागरिकांमध्ये लसीबाबतही असणारी भीती दूर करण्यासाठी म्हणून खुद्द पंतप्रधानांनीच लस घेतल्याचा निर्णय घेतला अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असतानाच युएईतून लसीबाबत आलेलं हे वृत्त सध्या दिलासा देणारं ठरत आहे.