वॉशिंग्टन: जगातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र ठरत असलेल्या अमेरिकेतील मृतांचा आकडा ५० हजाराच्या पार गेला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आठ लाख इतका झाला आहे. तर ८०,९३७ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. रुग्णांच्या शरीरात निर्जंतुके किंवा कृत्रिम लाईट टाकून त्यांना बरे करण्याचा मार्ग  शोधा, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शास्त्रज्ञांना केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत शौचालयाच्या टाकीतील पाण्याची तपासणी करुन कोरोना रुग्णांचा शोध
 
अमेरिकेत लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. या काळात उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे कोरोनाचे विषाणू कमकुवत होतील, असा एक मतप्रवाह पुढे येताना दिसत आहे. मात्र, या सिद्धांताला कोणताही ठोस आधार नाही. त्यामुळे अमेरिकेता कोरोनामुळे आणखी किती नुकसान होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 


...तर पाकिस्तानात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक राहणार नाहीत

अमेरिकेपाठोपाठ इटलीत कोरोनाचे सर्वाधिक २५,५४९ इतके बळी गेले आहेत. तर संपूर्ण जगात १,९२,१२५ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अमेरिकेतील डॉक्टरांसमोर सध्या एक नवा पेच उभा राहिला आहे. न्यूयॉर्कमधील अनेक कोरोना रुग्णांच्या शरीरातील रक्त गोठत असल्याचे आढळले आहे. तसेच अनेकांच्या मूत्रपिंडातही रक्त जमा होत आहे. त्यामुळे रुग्णांना ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.