सेल्फी घेताना कपलला लागली मृत्यूची चाहूल, फोटो पाहून हैराण झाले युझर्स
निसर्गाचा आगळा-वेगळा चमत्कार, कपलच्या त्या सेल्फीनंतर काय घडलं हे समजताच तुम्हाला बसेल धक्का
एडिनबर्ग: असं म्हणतात की काळ सांगून येत नाही. बऱ्याचदा तो येतो तेव्हा समजत ही नाही आणि सर्वांच्या नजरा चुकवतो. मात्र एका कपलनं मृत्यूला समोर पाहिलं आणि कॅमेऱ्यात कैदही करता करता राहिलं. या कपलनं आपला हा डेथ सेल्फी सोशल मीडियावर शेअर करताच युझर्सनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.
एका महिलेने असा 'डेथ सेल्फी' शेअर केला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. स्कॉटलंडच्या उत्तरेकडे वाइल्ड स्विमिंग टूरसाठी गेलेल्या सोफी पास (33) ने हा सेल्फी तिच्या जोडीदारासोबत शेअर केला.
स्कॉटलंडमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या सोफी पास आणि तिचा पती रिचर्ड यांच्यासोबत अंगावर काटा आणणारा हा धक्कादायक प्रकार घडला. दोघेही पावसाळ्यात स्कॉटलंडला गेले. या दरम्यान, अचानक त्याच्या सेल्फीमध्ये काहीतरी रेकॉर्ड झालं, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
मिररच्या रिपोर्टनुसार, सोफी आणि रिचर्ड सेल्फी घेत असताना पाऊस पडत होता. सेल्फी क्लिक करताना दोघांनाही जाणवले की काही मोठी मोठं घडतंय. अचानक, इलेक्ट्रोमॅग्नेटमुळे, सोफीचे केस हवेत वरच्या दिशेने ओढले जाऊ लागले. रिचर्ड आणि सोफीला हाच धोक्याचा इशारा मिळाला. त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला.
जेव्हा सोफी सेल्फी घेत होती, तेव्हा रिचर्डच्या लक्षात आलं की सोफीचे केस वर ओढले जात आहेत. त्याने लगेच सोफीचा हात पकडून पळ काढला. ते पळून जात असताना मध्ये काहीच सेकंद गेली असतील आणि आचनक त्यांनी जिथे सेल्फी घेतला होता त्या ठिकाणी वीज कोसळली. डोळ्या देखत हा प्रकार घडल्याने दोघंही चांगलेच घाबरले होते.
कपलने आपला संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर सेल्फीसहीत शेअर केला आहे. मोठ्या अपघातापासून कशा पद्धतीने हे दोघंही वाचले ते यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा फोटो पाहून युझर्सही हैराण झाले आहेत. पावसाळ्यात असं फिरणं धोकादायक होऊ शकतं असंही तिथे म्हटलं आहे.
सोफी म्हणाली, 'निसर्ग सुंदर आहे आणि आपण सर्वांनी त्याची काळजी घेणे गरजेचे आहे पण तुमच्या चुकीमुळे ते भितीदायक ठरू शकते.' असा जाता जाता सोफीने संदेशही दिला आहे. त्यामुळे मोकळ्या जागेवर जरी तुम्ही उभे असाल तरी तिथे वीज पडण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.