मुंबई : नवरा बायकोचं नातं फार सुंदर असतं, त्यामध्ये भांडणं, राग, रुसवे फुगवे सगळं काही येतं. हे सगळं जेव्हा नात्यात असेल तेव्हा तर ते नातं घट्ट टिकून रहातं. सोशल माडियावर तुम्ही जोडप्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असणार. ज्यात कधी प्रेम तर कधी मस्करी तुम्ही पाहिले असेल. सध्या अशाच एका जोडप्याचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्हाला वाटेल की, ही तर प्रत्येक घरा घरातली कहाणी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया साइट इंस्टाग्राम रील व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक प्रेमळ नवरा आपल्या बायकोला खूश करण्यासाठी घरातील सगळी कामं करतो, तो भांडी घासतो आणि किचन देखील साफ करतो. त्यानंतर तो आपली सगळी कामं उरकुन आपली बायको घरी येण्याची वाट पाहातो.


नवरा विचार करत असतो की, बायको घरी येईल तेव्हा तिला सगळ काम झालेलं पाहून आनंद होईल आणि ती त्याचं प्रेमाने कौतुक करेल, परंतु त्याच्या बाबतीत देखील प्रत्येक नवऱ्यासारखंच उलटं घडतं


सर्व काम पूर्ण केल्यानंतर नवरा त्याच्या बायकोची आतुरतेनं वाट पाहात असो, तो कधी सोफ्यावर फोन हातात घेऊन बायकोची वाट पाहत असतो, तर कधी दरवाजाजवळ उभा राहून तिला शोधतो. त्यानंतर पुन्हा सोफ्यावर येऊन बसतो, तेव्हा त्याला बायकोचा आवाज ऐकू येतो. परंतु बायको बाहेरूनच त्याला ओरडते आणि विचारते की, "तू खरोखर अजून कचरा फेकला नाहीस?"


हे ऐकल्यावर पतीने डोके धरले. ही तशी प्रत्येक नवऱ्या बायकोची कहाणी आहे. नवऱ्याने बायकोला इंप्रेस करायला कितीही मेहनत केली, तरी त्याच्याकडून काही ना काही राहातंच. ज्यामुळे त्याला प्रेमाचे चार गोड शब्द तर सोडाच पण उलटं बायकोचं बोलणंच खावं लागतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ फार आवडला आहे. लोकांना ही कहाणी त्याच्या कहाणी सारखी वाटतं आहे आणि लोकांनी हे मान्य केलं आहे की, हे त्यांच्यासोबत देखील घडलं आहे.