Intimate Relation ठेवताना तुम्ही करु नका ही चूक, नाहीतर.....
या कपलने त्यांचा हा अनुभव एका टीवी शोमध्ये सांगितला आहे.
अमेरिका : इंटिमेट रिलेशन ठेवताना एक अमेरीकन कपल सोबत असं काही झालं की महिलेला थेट रूग्णालयात दाखल करावं लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा हे दोघं संबंध ठेवत असताना बॉयफ्रेंड इतक्या जोशमध्ये आला की त्याचा फटका गर्लफ्रेंडला बसला आहे.
या कपलने त्यांचा हा अनुभव एका टीवी शोमध्ये सांगितला आहे. काही महिने डेट केल्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याला पुढे नेण्यासाठी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी घेतलेला हा निर्णय कटू आठवणीत बदलला.
House Partyमध्ये झाली होती भेट
'डेली स्टार'च्या बातमीनुसार, जेनिफर आणि ग्रेग यांची भेट एका हाऊस पार्टी दरम्यान झाली होती. यानंतर दोघांनी डेटींगला सुरुवात केली आणि सुमारे एक महिन्यानंतर जेनिफरने या नात्याला पुढे नेण्याचा विचार केला. दोघं घरी भेटले आणि संबंध बनवणार होते. या दरम्यान, ग्रेग खूप उत्साहित झाला, ज्यामुळे जेनिफरला रुग्णालयात जावं लागलं.
ग्रेग म्हणाला, 'मी पहिल्यांदा असं काहीतरी करत होतो, त्यामुळे मी खूप उत्साहित होतो. माझा उत्साह वाढला गेला. यावेळी वळणावर मी इतकी ताकद लावली यादरम्यान जेनिफर भिंतीवर आदळली गेली. आणि तिचं डोकं भिंतीमध्ये अडकलं.
ग्रेगने सांगितलं की ते एक अतिशय भीतीदायक दृश्य होतं. मला वाटले की मी जेनिफरला मारून टाकलं. मी तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं. तिच्या डोक्याला दुखापत झाली होती.
जेनिफर म्हणाली, 'भिंतीवर डोकं मारल्यानंतर मी बेशुद्ध झाले होते. माझं डोकं भिंतीवर आदळलं होतं. आता आम्ही दोघेही ती घटना विसरत आहोत आणि आमचं नातं मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत."