धक्कादायक! 60 हून अधिक कुत्र्यांवर बलात्कार आणि हत्या; कोर्टाने सुनावला तब्बल 249 वर्षांचा तुरुंगवास
ABC ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपी श्वानांना मृत्यू होईपर्यंत मारहाण करत असे. तसंच आपलं हे कृत्य तो कॅमेऱ्यात कैद करायचा.
प्राणीशास्त्रज्ञ आणि ब्रिटीश मगरी तज्ज्ञ असणाऱ्या ॲडम ब्रिटॉनच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरु असून, त्याच्या वकिलाने न्यायाधीशांना नवा अहवाल सादर केला आहे. यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कोर्ट आता ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मिररच्या वृत्तानुसार, ब्रिटॉनवर डझनभर कुत्र्यांवर बलात्कार, अत्याचार आणि हत्या केल्याचा आरोप आहेत. त्याला 249 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गतवर्षी, ब्रिटॉनने प्राणी क्रूरतेच्या 60 हून अधिक आरोपांसाठी त्याला दोषी ठरवलं होतं.
गुरुवारी एनटी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मायकल ग्रँट यांनी त्यांचे कर्मचारी आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांना सुनावणी सुरू होण्यापूर्वी बाहेर जाण्याची विनंती केली असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. "माझ्या मूल्यांकनानुसार सामग्रीमध्ये चिंताग्रस्त शॉक किंवा इतर काही मानसिक त्रास होण्याची क्षमता आहे," असं वृत्त एबीसीने दिलं आहे. तसंच ही प्राण्यांवरील क्रूरता असल्याचंही नमूद केलं.
लोक अंतिम निकालाची वाट पाहत असताना, त्याच्या वकिलाने एक नवीन अहवाल सादर केला आणि न्यायाधीशांना त्यावर विचार करण्याची विनंती केली. कारागृहात "मानसशास्त्रज्ञांच्या माध्यमातून सुमारे 30 तास उपचार" घेतल्यानंतर त्याच्या सद्यस्थिती काय आहे याची माहिती अहवालात देण्यात आली आहे असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं.
“पश्चाताप हा पुनर्वसनाच्या संभाव्यतेचा पुरावा मानला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा यासंबंधी बोलते तेव्हा कदाचित ते जाणवणार नाही. त्या अशा गोष्टी आहेत ज्या बऱ्याचदा उपचाराने विकसित होतात. त्या दगडाला बांधलेल्या नसात," असे ब्रिटॉनच्या वकिलाचे म्हणणे आहे.
आपल्या आशिलायीच शिक्षा कमी करण्याची विनंती करताना, वकील पुढे म्हणाला, “हा एक माणूस आहे जो अगदी लहानपणापासूनच एका समस्येने त्रस्त आहे. ही त्याची चूक नाही. ही विशिष्ट स्थिती बहुतेक समाजांमध्ये अपवादात्मकपणे निषिद्ध आहे. मला आशा आहे की, कोर्ट समजू शकेल की मोठे होताना आणि मोठे झाल्यावर ते हाताळताना फार कठीण जातं".
नेमकं प्रकरण काय?
ABC च्या रिपोर्टनुसार, आरोपी ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे कुत्र्यांचा छळ करत होता आणि त्यांना मारहाण करत होता. आपल्या क्रौर्याचे कृत्यही तो रेकॉर्ड करत असे. अहवालात सांगण्यात आलं आहे की, ब्रिटॉनकडे एक "छळ खोली" होती. हे एक शिपिंग कंटेनर होतं. जिथे तो कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार करत असे.