नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  कहर अद्याप सुरुच आहे. काही देशांमध्ये कोरोना रोखण्यासाठीच्या लसीकरणास सुरुवात झालीय. तर काही देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या विळख्यात येऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागलेयत. कोरोना संक्रमण झालेल्या काही लोकांमध्ये दात कमकुवत होऊन तुटण्याची समस्या आढळली. न्यूयॉर्क टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात ४३ वर्षांच्या फराह खेमिली यांच्यात ही लक्षणं दिसून आली. फराह या कोरोना संक्रमित झाल्या होत्या. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. पण एक दिवस त्यांना दातातून झिणझिण्या येऊ लागल्या. त्यांना बोट लावून पाहीलं तर खालचा दात हलत होता. त्यानंतर अचानक निखळून तो हातात आला. 



यावर संशोधक आणि दंतचिकित्सकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलीयत. कोरोनाचा दातांवर प्रभाव जाणवतो यात कोणत तथ्य नसल्याचे संशोधक म्हणतात. तर काही दंतिचिकित्सक कोरोनाचा दातांवर प्रभाव पडू शकतो असे म्हणतात. पण दंतचिकित्सकांच्या या म्हणण्याला कोणत्याही पुराव्याचा आधार नाहीय. 


कोरोना व्हायरसमधून ठीक झाल्यानंतर केस गळणे आणि पायांच्या बोटांना सूज येण्याची लक्षणं आढळली. दात अचाक तुटून बाहेर येणं हे आश्चर्यजनक असल्याचे युनिव्हर्सिटी ऑफ उटाहच्या पीरियडॉन्टीक्स (Periodontics) डॉ. डेव्हिड ओकानो यांनी म्हटलंय.