सुपर व्हॅक्सिन ! सातत्याने रुप बदललणाऱ्या Coronavirusचा खात्मा करण्याची तयारी, काय आहे हे Vaccine?
जगभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाट सुरु आहे. या दुसऱ्या लाटेने परिस्थिती अधिक बिघडवली आहे.
मुंबई : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाट सुरु आहे. या दुसऱ्या लाटेने परिस्थिती अधिक बिघडवली आहे. कोरोना व्हायरस सतत वेगवेगळ्या व्हेरियंट्समध्ये येत आहेत. प्रथम ब्रिटन व्हेरियंट्स पुन्हा ऑफ्रीकन व्हेरियंट्स त्यानंतर ब्राझील आणि आता भारतीय व्हेरियंट्स. त्यामुळे कोरोना विषाणूचे संकट हे अधिक वाढताना दिसून येत आहे. आता या विषाणूचे सर्व प्रकारचे युनिव्हर्सल व्हॅक्सिन (Super Vaccine) येत आहे. या Super Vaccineची चाचणी सुरु आहे. हे सुपर व्हॅक्सिन एकदाच वापरले की काम तमाम. पुन्हा कोरोनाचा व्हायरस कितीही वेळा म्यूटंट झाला तरी काहीही फरक पडणार नाही. तसेच कोरोनाचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. (Super Vaccine: Scientists Invent New Vaccine that Can Fight All Forms, Mutations and Strains of Coronaviruses)
शास्त्रज्ञांनी नवीन लसीचा शोध लावला आहे. ज्यामुळे कोरोनाव्हायरसचे सर्व फॉर्म, बदल आणि स्ट्रेनचा सामना करु शकणार आहे. ही नवीन लस 'सुपर लस' म्हणून ओळखली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण झालेल्या लोकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. परंतु आता, संशोधकांना अशी नवीन लस सापडली आहे. ज्यामुळे सर्व कोरोनव्हायरसपासून संरक्षण मिळू शकणार आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण पध्दतीचा उपयोग करुन लस तयार करण्यात आली आहे. यासाठी यूव्हीए हेल्थचे ( UVA Health) स्टीव्हन एल. झेचनेर (Steven L. Zeichner) आणि व्हर्जिनिया टेकचे ( Virginia Tech) झियांग-जिन मेंग (Xiang-Jin Meng) या संशोधकांनी दिवस-रात्र एक करुन कोरोनाविरोधातील सुपर व्हॅक्सिनचा शोध लावला आहे. कोविड-19च्या SARS-CoV-2 वर ही नवीन लस अधिक प्रभावी ठरणारी आहेच. शिवाय कोरोनाच्या कोणत्याही नव्या स्ट्रेनवर रामबाण ठरणार आहे. त्यामुळे ही व्हॅक्सिन घेतल्यानंतर कोरोनापासून अधिक सुरक्षा मिळणार आहे.
लसीचा एक डोस सर्व कोरोनाविषाणूला पुरेसा?
झेचनेर (Zeichner) आणि मेंग (Meng) यांनी तयार केलेली लस कोरोनाविषाणूचा खात्मा करण्यासाठी एक डोस पुरेसा आहे. ( one vaccine fight all coronaviruses) ही नवी लस एक असामान्य दृष्टीकोनातून तायर केली गेली आहे. त्यामध्ये व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनच्या एका भागास लक्ष्य करते ज्याला "व्हायरल फ्यूजन पेप्टाइड" (viral fusion peptide) म्हणतात. कोरोनव्हायरसमध्ये हे फ्यूजन पेप्टाइड मूलत: सार्वभौमिक आहे; खरं तर, जगभरातील हजारो रूग्णांकडून प्राप्त झालेल्या SARS-CoV-2च्या कोणत्याही अनुवंशिक अनुक्रमात तो बदललेला किंवा वेगळाच नाही. या युनिव्हर्सल भागाला लक्ष्य करण्याची लसची क्षमता हीच आहे की ती सर्व कोरोनव्हायरस विरूद्ध प्रभावी ठरवते.
त्याची प्रभावीता तपासण्यासाठी, झेचनेर (Zeichner)आणि मेंग (Meng) यांनी यांनी दोन लस बनवल्या. एक मानवांमध्ये कोविड -19पासून संरक्षण करण्यासाठी तयार केली गेली आणि दुसरे डुकरांमध्ये पोरसिन एपिडेमिक डायरिया लस (पीईडीव्ही) पासून संरक्षण करण्यासाठी बनविली गेली. हे दोन्ही रोग दूरस्थपणे संबंधित कोरोनाव्हायरसमुळे उद्भवतात, जे फ्यूजन पेप्टाइड बनविणारे अनेक amino acids सामायिक करतात.
या दोन्ही लस डुकरांच्या वेगवेगळ्या गटाला दिल्या गेल्या आणि त्यानंतरच्या विश्लेषणावरुन असे दिसून आले की पीईडीव्हीची लस तसेच SARS-CoV-2 ची लस पीईडीव्हीमुळे होणाऱ्या आजारापासून डुकरांना संरक्षण देते. लस संसर्गास पूर्णपणे प्रतिबंधित करीत नसले तरी त्यांनी डुकरांना गंभीर लक्षणे विकसित होण्यापासून यशस्वीरित्या रोखले आणि सुरक्षित केले. शिवाय, त्यांनी संक्रमणासंदर्भात अधिक प्रतिकारशक्ती प्रतिसाद देण्यासाठी डुकरांच्या रोगप्रतिकारक शक्तीचीही तारण ठरली आहे. त्यामुळे ही लस लवकरच उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.
या निरीक्षणाद्वारे वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की जर पीईडीव्ही आणि कोविड -19 या दोन्ही लसांनी पीईडीव्हीमुळे होणाऱ्या रोगापासून डुकरांना संरक्षण दिले आणि रोगप्रतिकारक शक्तीला या रोगाविरुद्ध लढा देण्याचे ठरवले तर कोविड -19 ही लसदेखील मानवाचे रक्षण करेल असा विचार पुढे आला आहे. गंभीर कोरोनाव्हायरस संक्रमणाविरुद्ध ही लस एक प्रभावी हत्यार ठरणार आहे.