मेक्सिको सिटी : कोरोना व्हायरस (Corona Virus) रोखण्यासाठी तयार झालेल्या (Covid-19 Vaccine)  लसीमुळे जगभरात लोकांना एक आशा आहे. या लसीमुळे कोरोनाचा प्रभाव कमी होईल अशी सामान्यांना अपेक्षा आहे. मात्र आता अशी बाब समोर आली आहे की, लसीमुळे नागरिक सुरक्षित नाहीत. कारण कोरोना लसीचे साइड इफेक्ट होताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेक्सिको येथे फाइजर व्हॅक्सीन (Pfizer Caccine) बाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. एक महिला डॉक्टरला कोविड-१९ ची फाइजर व्हॅक्सीन घेतल्यानंतर लकवा मारला आहे. 


डॉक्टर महिलेला होती ऍलर्जी 


मेक्सिकोमध्ये कोविड-१९ व्हॅक्सीन घेतल्यानंतर अर्ध्या तासाने एका महिला डॉक्टरला त्रास होऊ लागला. व्हॅक्सीन घेतल्यानंतर तिला अतिशय थकवा जाणवू लागला. श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्यामुळे महिलेला रुग्णालयात आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं. 


या प्रकरणाबात आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की,'डॉक्टर महिलेच्या डोक्याला आणि स्पाइनल कॉर्डमध्ये (Encephalomyelitis) सूज आली आहे. यावर उपचार सुरू आहे. व्हॅक्सीन लागण्याअगोदर डॉक्टर कार्ला यांना एंटीबायोटिकमुळे ऍलर्जी होती. यामुळेच त्यांना कोरोना व्हॅक्सीनचा त्रास झाला आणि गंभीर दुखापत झाली.'


कुटुंबाने व्हॅक्सीनच्या तपासाची केली मागणी 


अर्धांगवायू झालेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी व्हॅक्सीनच्या दुष्परिणामाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असा आग्रह धरला आहे की, या व्हॅक्सनची तपासणी व्हावी. आरोग्य मंत्रालयाने याची चौकशी करावी. 


आरोग्य मंत्रालयाचा दावा 


आरोग्य मंत्रालयाचं असं म्हणणं आहे की,'आम्ही या गोष्टीवर जोर देणार नाही की, डॉक्टर कार्ला यांना व्हॅक्सीनमुळे लकवा मारला. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू की याचा व्हॅक्सीनशी काही संबंध आहे का? कारण खरं कारण जाणून घेण्यासाठी काही गोष्टी तपासाव्या लागतील.'