Cow Fall In Sinkhole Video: मानवाच्या चुकांची किंमत अनेकदा मुक्या जनावरांना मोजावी लागते. सोशल मीडियावर तर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये लोकांच्या एका चुकीचा फटका एखाद्या जनावराला बसतो. हे व्हिडीओ पाहून अनेकदा धक्काही बसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये क्रेनच्या मदतीने सिंकहोलमध्ये पडलेल्या गायीला बाहेर काढत असल्याचं दिसत आहे. ही गाय एका सिंकहोलमध्ये पडल्यानंतर तिला बाहेर काढण्यासाठी फारच कसरत करावी लागते.


बऱ्याच वेळाने गाय खड्ड्यात पडल्याचं लक्षात आलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक गाय कळपामध्ये चरत असताना ती सिंकहोलमध्ये पडली. चरत असताना या खड्ड्याजवळ गेलेल्या गायीला खड्डा किती खोल आहे याचा अंदाज आला नाही आणि ती थेट तोंड खालच्या बाजूला असतानाच सिंकहोलमध्ये पडली. ही गाय चरत चरत खड्ड्याजवळ गेली आणि खड्ड्यात वाकून बघत असतानाच तिचा पाय सरकल्याने ती खाली पडल्याचं सांगण्यात आलं. या गायीबरोबर इतरही अनेक गाया या ठिकाणी चरत होता. ही गाय खड्ड्यात पडल्यानंतर इतर गायी या ठिकाणावरुन पळून गेल्या. बऱ्याच वेळाने एक संपूर्ण गाय या खड्ड्यात पडल्याचं लक्षात आलं. 


...अन् तिला खड्ड्यातून वर काढलं


गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी या सिंकहोलकडे धाव घेतली असता गाय अगदी सरळ म्हणजेच तोंड खाली आणि पाय वर अशा अवस्थेत खड्ड्यात पडल्याचं पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. बाजूला खड्डा खोदून गायीला बाहेर काढणं शक्य होणार नव्हतं. त्यामुळेच क्रेनने या गायीच्या पायाला बांधून वर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे गायीला बाहेर काढण्यात आलं. ही गाय वर काढण्यात आली तेव्हा कोणतीही हलचाल करत नव्हती. ही गाय मेली की काय असं लोकांना वाटलं. मात्र काही वेळानंतर या गायीने हलचाल केली. गायीने आधी आपले पाय हलवले आणि त्यानंतर डोकं हलवलं. गायी हलचाल करत असल्याचं पाहून तिला वाचवणाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हा अनोख्या रेस्क्यु ऑप्रेशनमुळेही मदतकार्यासाठी पुढे आलेल्या शेतकऱ्यांना घाम फुटला.



सर्वांनी केलं कौतुक


अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवून या गायीला सुखरुपपणे बाहेर काढणाऱ्या टीमचं कौतुक केलं आहे. या टीमचे फारचं चांगलं काम केल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. अन्य एकाने इतर गायी या गायीला पाहण्यासाठी जितक्या वेगाने तिच्या अवतीभोवती गोळा झाल्या ते पाहून फार छान वाटलं असं म्हटलं आहे. या व्हिडीओला फेसबुकवर 54 हजार लाइक्स मिळाले आहेत. 2 हजार 700 हून अधिक कमेंट्स या पोस्टवर करण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ ब्रिटनमधील विटॉन कॅसलमधील आहे.