बर्लिन : प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन नसतं. जात, धर्म, देश यांपलीकडे जाऊन व्यक्ती एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात. शिवाय जीवनभर एकमेंकांची साथ देण्याचे वचन देत असताता. पण आता एक असं प्रेमप्रकरण समोर येत आहे, की ज्यावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे. बर्लिनची एक ३० वर्षीय मुलगी चक्क विमानाच्या प्रेमात पडली आहे. हे प्रेमप्रकरण इथचं थांबत नाही तर विमानाच्या प्रेमात वेडी असलेली ही मुलगी विमानासोबत लग्न करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर्मनीतील ही प्रेम कहाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. विमानाच्या प्रेमात फार बुडालेल्या या तरूणीचे नाव मिशेल कॉबेक (Michele Köbke) असं आहे. त्या विमानाचे नाव बोईंग ७३७-८०० असं आहे. ६ वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात या विमानाची एन्ट्री झाली.



बोईंग ७३७-८०० ला ती प्रेमाने Schatz अशी हाक मारते. Schatz हा जर्मन शब्द आहे. Schatz म्हणजे 'डार्लिंग'. सध्या त्यांची ही प्रेमकथा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरत आहे. 'द सन'ने या प्रेमकथेला दुजोरा दिला आहे. 


ज्या वेळी मिशेलने त्या विमानाला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनंतर तिला आपल्या प्रियकराला भेटण्याची संधी मिळाली. आपल्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. 


मिशेलच्या कुटुंबाला देखील तिच्या या नात्याविषयी माहित आहे. या नात्याला ऑब्जेक्ट सेक्शुऍलिटी किंवा ऑब्जेक्टोफिलिया असे म्हणतात. अशा स्थितीत व्यक्ती कोणत्याही निर्जीव गोष्टींकडे आकर्षित होतो.