वॉशिंग्टन: पती-पत्नीमध्ये बऱ्याचदा वाद झाला की अबोला होता. काहीवेळा वस्तुंची आपटाआपटीही होते. मात्र विमानात झालेल्या वादामुळे पत्नीचा जीव घेणाऱ्या या व्यक्तीचं धक्कादायक समोर आलं आहे. यासंदर्भात कोर्टात केस सुरू असताना हे भीषण वास्तव समोर आलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एबीसीने दिलेल्या वृत्तानुसार,रॉबर्ट म्हणाला की, कानाजवळ पत्नी जोरात ओरडत होती. त्याचा राग आला. त्यासाठी आरोपी व्यक्तीनं तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकायला तयार नव्हती. तिची अखंड बडबड सुरूच होती. त्यामुळे संताप अनावर झाला. मी तिला समुद्रात फेकून दिलं असा दावा या व्यक्तीनं केला. त्याने आपला गुन्हा कबूल केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. खासगी विमानात नेमकं काय घडलं हे त्याने कबुलीमध्ये सांगितलं आहे. 


अमेरिकेच्या एका माजी प्लास्टिक सर्जनला 1985 मध्ये पत्नीची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं. न्यायालयासमोर रॉबर्ट बेरेनबॉमने कबूल केलं की त्याने आपल्या पत्नीची हत्या केली होती. त्याने ही हत्या का आणि कशी केली हे आणखी धक्कादायक आहे. बेरेनबॉमने न्यायालयाला सांगितले, 'पत्नी गेल काट्झ घटनेच्या दिवशी माझ्या कानाजवळ मोठ्याने ओरडत होती. मला राग आला. मी तिचा गळा दाबून खून केला. तयानंतर खासगी विमानातून समुद्रात मृतदेह फेकून दिला.


रॉबर्ट मनोरुग्ण असल्याची माहिती देखील समोर आली आहे. हीच थेअरी 2000 साली वकीलांकडून सांगण्यात आली होती. त्याचा कबुलनामा रॉबर्टने अखेर असाच दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.