मुंबई : असे म्हटले जाते की, राग ही राक्षस असतो कोणत्याही माणसाला तो आला की, कोणीही मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही. मग त्याचा परिणाम अत्यंत भयानय असला तरी माणसाला ते कळतं नाही. मग राग ओसरला की, माणसाला आपली चूक कळते, परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. त्यामुळे माणसाचे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. रागात घेतलेला निर्णय या तुम्हाला नेहमीच विनाशाकडे घेऊन जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच असाच एक प्रकार अमेरिकेत घडला. येथे रागात एक व्यक्ती रागात असा काही संतापला होता की, त्यांनी स्वत:च्याच मुलीला मारण्याचा प्रयत्न केला आणि हे त्याच्या लक्षात देखील आले नाही.


या व्यक्तीने रागाने आपल्या मुलीला वॉशिंग मशिनमध्ये टाकून त्याचे स्विच सुरू केले होते. ज्याचा गंभीर परिणाम त्याला भोगावा लागला.


न्यूयॉर्क पोस्ट या न्यूज वेबसाईटच्या अहवालानुसार ही धक्कादायक घटना अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमध्ये घडली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी 34 वर्षीय सनकी बाप माइकल हिगिंस (Michael Higgins) याला अटक केली आहे.


मायकलवर त्याच्या दोन वर्षांच्या मुलीची हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली गेली आहे. मुलीच्या आईनेच पोलिसात ही तक्रार दाखल केली, ज्यानंतर आता मायकलवरती कारवाई केली जात आहे.


काय होतं प्रकरण?
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायकल हा मूळचा मँचेस्टरचा आहे. त्याचे काही मुद्द्यावरून त्याच्या पत्नीशी भांडण झाले होते. प्रकरण इतके वाढले की, तो रागाच्या भरात भडकला आणि त्याने आपल्या मुलीला वॉशिंग मशीनमध्ये टाकले.


तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मशिनचे स्विच देखील सुरू केले. परंतु सुदैवाने त्या मुलीच्या आईने वेळेत मशीन बंद केले हे सुदैव आहे. यानंतर तिने आपल्या मुलीला बाहेर काढले. मुलीला तशी किरकोळ दुखापत झाली आहे. पण तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.