Father Son Love Story: एका मुलाने आपल्या वडीलांच्या मृतदेहावर (Dead Body) अंत्यसंस्कार न करता फ्रिजमध्ये (Fridge) ठेवल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे तो मुलगा आपल्या वडीलांच्या मृतदेहाशी दररोज गप्पाही मारायचा. मृतदेहाचा दुर्गंध येऊ नये यासाठी त्या मुलाने त्यांचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवला आहे. तब्बल 18 महिन्यांनी ही घटना उघडकीस आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना नेदरलँडमधली (Netherland) असून मीडिया रिपोर्ट नुसार 101 वर्षांच्या वृद्ध माणसाचा मृत्यू झाला. त्यांच्या 82 वर्षांच्या मुलाने ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. कोणालाही कळू न देता त्याने वडिलांचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवला. त्यानंतर तो दररोज मृतदेहाशी गप्पा मारायचा. एकेदिवशी त्याची तब्येत बिघडल्याने तपासणीसाठी डॉक्टर घरी आले, त्यावेळी ही घटना उघड झाली. डॉक्टरने त्यांच्या वडीलांच्या तब्येतीची विचारपूस केली. पण त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 


पोलिसांनी घरी येऊन चौकशी केली असता वडिलांचा मृतदेह घरातल्या फ्रिजरमध्ये आढळला. मृतदेह 18 महिन्यांपासून फ्रिजमध्ये असल्याचं कळताच पोलिसांनाही धक्का बसला त्यानंतर पोलिसांनी मुलाकडे त्यांच्या कृत्याबद्दल विचारणा केली. मुलाचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं. वडील आणि मुलगा दोघंच राहात असल्याने दोघांना एकमेकांचा आधार होता. वडिल सोडून गेल्याचा मुलाच्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे त्याने वडीलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी घरातच ठेवला.


जेव्हा त्याला वडिलांशी बोलण्याची इच्छा व्हायची तेव्हा तो फ्रिजरचा दरवाजा उघडायचा आणि वडिलांच्या मृतदेहाशी गप्पा मारायचा. कारण ऐकल्यावर पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


7 वर्ष आणि 30 हत्या
दरम्यान, भारतात एका सीरिअल किलरच्या धक्कादायक कारनाम्यांचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका 24 वर्षीय आरोपीला अटक केली असून त्याची कृत्य अंगावर शहारे आणणारी आहेत. सात वर्षात त्या आरोपीने तब्बल 30 हत्या केल्याचं उघड झालं आहे. हत्या करण्यआधी तो बलात्कार करायचा. उत्तरप्रदेशमधल्या कासगंज इथं राहणाऱ्या रविंद्र कुमार या नराधमाला याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे.


आरोपी रविंद्र कुमारने 2008 ते 2015 दरम्या तब्बल 30 मुलांची हत्या केली. यात 2 वर्षांपासून 12 वर्षांपर्यंतच्या मुलांचा सहभाग होता. रवींद्र कुमारला लहानपणीच पॉर्न हॉरर फिल्म पाहण्याची सवय लागली. यात आरोपी बलात्कार केल्यानंतर हत्या करत असल्याचं त्याने पाहिलं आणि तशीच कृती करायचं त्याने ठरवलं. त्यानंतर त्याने शिकार शोधायला सुरुवात केली. ग्रामीण किंवा खेड्यापाड्याीतल्या कुटुंबातील लहान मुलांना तो हेरायचा. त्यांना पैसे किंवा चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून त्यांना सुमसाम जागेवर न्यायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. आपली ओळख पटू नये यासाठी तो त्या मुलांना मारुन टाकायचा.