School firing in America : गोळीबाराच्या घटनेने अमेरिका पुन्हा हादरली आहे. व्हर्जिनियातील एका शाळेत 6 वर्षांच्या मुलाने शिक्षिकेवर गोळीबार केला आहे. यात शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. व्हर्जिनियातील न्यूपोर्ट न्यूज शहरातील प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. या शहराची लोकसंख्या 1 लाख 85 हजारांपेक्षा जास्त आहे. हे शहर चेसापीक आणि व्हर्जिनिया बीचपासून 40 मैलांवर आहे. अमेरिकन नेव्हीसाठी जहाजबांधणीसाठी हे शहर ओळखलं जाते. 


 गोळीबारात एक शिक्षिका गंभीर जखमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेत गोळीबार झाल्याने एकच गोंधळ झाला. व्हर्जिनियामध्ये (Virginia) एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात एक शिक्षिका गंभीर जखमी झाली. (Shooting in America) जखमी शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. शिक्षिकेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुलाला ताब्यात घेण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. या घटनेत अन्य कोणाचाही सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले.


 या प्रकरणी एका विद्यार्थ्याला घेतले ताब्यात 


 मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिक्षिकेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सांगण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, व्हर्जिनियातील न्यूपोर्ट न्यूज शहरातील प्राथमिक शाळेत ही घटना घडल्याची पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सुदैवाने या गोळीबारात विद्यार्थ्यांपैकी कोणीही जखमी झालेले नाही. व्हर्जिनियाचे महापौर फिलिप जोन्स यांनी सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी व्हर्जिनिया प्राथमिक शाळेत एका 6 वर्षीय विद्यार्थ्याने एका शिक्षकावर गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. रिचनेक एलिमेंटरी स्कूलमधील या घटनेत कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही, असे न्यूपोर्ट न्यूज पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.


या विद्यार्थ्याचे वय किती आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्समध्ये, गोळीबार करणारा विद्यार्थी केवळ 6 वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले आहे. दुपारी दोनच्या सुमारास आम्हाला गोळीबाराच्या संदर्भात कॉलवर माहिती मिळाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.