वॉशिंग्टन: चक्क महिलेला किस करायला नाही म्हटलं म्हणून एका तरुणाला आपला जीव गमवण्याची वेळ आली आहे. इतकच नाही तर किस्स हे तरुणानं नाही तर महिलेनं मागितलं होतं. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेला KISS केलं नाही म्हणून तिने तरुणाला संपवल्याची घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही धक्कादायक घटना अमेरिकेतील Illinois परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 28 वर्षीय कलॉडिया नावाची महिला दोन फ्रेण्ड्स सोबत दारू पार्टी करत होती. जेम्स जोनस, त्याची गर्लफ्रेंड आणि कलॉडिया हे तिघंही खूप खूश होते. त्यांची दारू पार्टी सुरू होती. मात्र त्याच दरम्यान मोठा अनर्थ घडला. 


जेम्स त्याच्या गर्लफ्रेंडला KISS करू लागला. हे पाहून कलॉडियालाही इच्छा झाली. तिने जेम्सला किस्स करण्याचा हट्ट धरला. मात्र जेम्सनं सरळ नकार दिला. त्यावेळी कलॉडियाला संताप अनावर झाला. तिने थेट बंदुकीतून जेम्सवर गोळी झाडली. या महिलेचा राग अनावर झाला होता. 


कलॉडियाने जेन्सला पुन्हा किस्स करायला सांगितलं. जेम्सने यासाठी पुन्हा नकार दिला. त्यामुळे महिलाला खूप राग आला. रागाच्या भरात महिलेनं आपली बंदूक उचलली तरुणावर गोळी झाडली. जेम्सने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी त्याच्या छातीला लागली होती. फर्स्ट डिग्री मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला.