Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचा हल्ला करतानाचा व्हिडीओ पाहिला मिळतात. भयानक आणि भीतीदायक हे व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. अशाच एक प्राणीसंग्रहालयातील एक भयावह व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवितोय. अनेक वेळा प्राणीसंग्रहालयातील तज्ज्ञ असलेले प्राण्यांची काळजी घेणारे केअरटेकरदेखील हे प्राणी हल्ला करतात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मगरीने अशा महिले तज्ज्ञावर हल्ला केला आहे. (crocodile attackedon zoo keeper grabbed women video viral on google today Trending Video)


भयावह व्हिडीओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता प्राणीसंग्रहालयात मगरीला पाहण्यासाठी तिथे लहान मुलांसह मोठी लोक आली आहेत. तेवढ्यात प्राणी संग्रहातील केअरटेकर मगरीला अन्न देण्यासाठी आली. तेव्हा महिलेने हात पुढे करताच मगरीने तिच्यावर हल्ला केला. एवढंच नाही तर त्या मगरीने महिलेचा हात जबड्यात घट्ट धरुन ठेवला होता आणि तिला पिंजऱ्यात ओढून घेतलं. 


हे दृश्यं पाहून प्राणीसंग्रहालयातील लोक भीतीने घाबरुन गेले. महिलेने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तर प्राणीसंग्रहालयातील इतर केअरटेकर त्या महिलेच्या मदतीला धावून आले. एका व्यक्तीने मगरीच्या जबड्यातून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण मगरीने तो खूप घट्ट धरला होता. 


सोशल मीडियावरील CCTV IDIOTS या अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 1.2 मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. महिलेच्या मदतीसाठी प्राणीसंग्रहालयाच्या रक्षक आले खरी पण मगरीने काही त्या महिलेचा हात सोडला नाही. पिंजऱ्यात महिलेला ओढून घेतल्यावर मगर आणखीनच हिंसक झाली. 



लेडी किपरला वाचवण्यासाठी दोन व्यक्ती पिंजऱ्यात उतरली तरी ते अपयशी ठरली. हे सगळं खूप भयावह होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकरी हैराण झाले आहेत.