Viral Video : प्राणी-पक्ष्यांचं अनेकांना वेड असतं. अनेकांच्या घरात आपल्याला वेगवेगळे पाळीव प्राणी दिसतात. पावसामुळे निसर्ग मस्त बहरून गेला आहे. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ पण सोशल मीडियावर प्रचंड पाहायला मिळतात आहे. प्राणी-पक्ष्यांचे व्हिडीओ खूपच मजेदार असतात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता. हे व्हिडीओ पाहिल्यावर चेहऱ्यावर मस्त स्मित हास्य येतं. काही व्हिडीओ बघून तर हसून हसून लोटपोट व्हायला होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कावळा हा पक्षी कोणाला आवडतं नाही. पण या कावळ्याचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून आपल्याला ही अशी मस्ती करता यावी असं वाटतं. या व्हिडीओमध्ये कावळा निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना दिसतो आहे. माणसांना आपण अनेक जुगाड करताना पाहिले आहे. तसे व्हिडीओ पण सोशल मीडियावर आहेत. पण या कावळ्याने जो काही जुगाड केला आहे ते पाहून तुम्हालाही त्याचा हेवा वाटेल.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वत्र बर्फाचे साम्राज्य आहे. अशात एक कावळा एका घराच्या छतावर बसला आहे. या छतावर मस्त बर्फ पसरला आहे. असा बर्फ पाहून तुम्हाला काय करावसं वाटेल, तसंच काहीस या कावळ्याचा मनात आलं. मग काय त्याने जुगाड केला आणि एक डब्याच्या झाकण्याचा मस्त स्लाइड म्हणून उपयोग केला. पहिल्या स्लाइडमध्ये कावळ्याला खूप मजा आली. म्हणून तो वारंवार स्नोबोर्डिंगची मजा घेऊ लागला जे तुम्ही व्हिडीओमध्ये देखील पाहू शकता. कावळ्याची ही मजा पाहून तुम्हाला देखील काही वेळासाठी विश्वास बसणार नाही.



हा मजेदार व्हिडीओ @gunsnrosesgirl3 या नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत 93 लाख यूजर्सने तो पाहिला आहे. तर अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे. या व्हिडीओवर एका यूजरने म्हटलं आहे की, ''जुगाड टेक्नोलॉजीचा उपयोग करणं शेवटी यांना पण यायला लागलं.'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे की, ''या कावळ्यासारखी मला पण स्नोबोर्डिंग करायची आहे.'' तर इतर यूजर्सने लिहिलं आहे की, ''हा व्हिडीओ खूप क्यूट आहे.'' तर काही यूजर्सने कावळ्याच्या स्मार्टनेसचं कौतुक केलं आहे.