पोपट पिटेकर, झी मीडिया,मुंबई: भारतात म्हशींच्या विविध प्रजाती (Different species of buffaloes in India) आहेत. या प्रजातींमध्ये आफ्रिकन म्हैस (African buffalo), जंगली म्हैस (wild buffalo) आणि पाण म्हैस (water buffalo) यांचा समावेश होतो. पाण म्हैस हा भारतात आढळणारा म्हशीचा मुख्य प्रकार आहे.ज्याला आपण भारतीय म्हैस (Indian buffalo) म्हणून देखील ओळखतो. परंतु या व्यक्तीरिक्त उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)मधील एका म्हशीची देशात खुपच चर्चा आहे. उत्तर प्रदेशातून विचित्र किस्से नेहमीच समोर येत असले तरी ही बातमी कळल्यावर तुम्हालाही मोठा धक्का (Big shock) बसू शकतो. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये तीन दिवसीय अखिल भारतीय किसान मेळावा (All India Kisan festival) आयोजित केला जात आहे. या जत्रेच्या पहिल्याच दिवशी एका म्हशीने लोकांना आपल्याकडे आकर्षित केलं. चला तर पाहूयात या म्हशी बद्दल....


काय आहे संपूर्ण प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणाचे शेतकरी (Haryana Farmers ) पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले नरेंद्र सिंह (Narendra Singh)आपल्या म्हशीसह या जत्रेत पोहोचले होते. येथे नरेंद्र सिंह आपली 10 कोटी रुपयांची गोलू (Golu buffalo)2 म्हैस घेऊन आले होते.
ही म्हैस मुर्रा प्रजातीची (Buffalo Murra species) असून तिचं वजन तब्बल 15 क्विंटल (Golu15 quintal) आहे.


म्हशीचा आहार


म्हशीची किंमत करोडो रुपये आहे. त्याचं वय हे ४ वर्षे ६ महिने आहे.
येवढ्या करोडो किंमतीच्या म्हशीचा विचार तरी लोक करू शकतात का हा प्रश्न आहे. तसेच या म्हशीची देखरेक आणि त्यांची काळजी घ्यावी लागते. गोलूचा रोजचा खर्च (Daily expenses of Golu) सुमारे एक हजार रुपये आहे. त्याच्या आहारात 30 किलो कोरडा हिरवा चारा (dry green fodder), 7 किलो गहू हरभरा आणि 50 ग्रॅम खनिज मिश्रणाचा समावेश असतो. परंतु त्यांच्या वीर्यातून चांगले उत्पन्न मालकाला मिळतो.


म्हशीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी


म्हशीला पाहून अनेक लोकांची घेण्याची इच्छा व्यक्ती केली. परंतु मालकांनी त्यांला विकण्यास नकार दिला. पण त्या म्हशीची किंमत तब्बल 10 कोटी रुपये असल्याचं अंदाज आहे. या म्हशीची उंची पाहून जत्रेत अनेकजण तिच्याभोवती जमा होऊन आचार्याने पाहतच राहतात.