मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर येथे आपल्याला स्टंट संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही तरुण प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करतात असे काही स्टंट करतात, ज्यामुळे त्यांना आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागते. सध्या असंच काही प्रकरण एका तरुणासोबत घडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर दोन प्रसिद्ध YouTubers ने धोकादायक स्टंट केलं, ज्यामुळे एका तरुणाचा अपघात घडला, ज्यानंतर जखमी युट्युबरने दुसऱ्यावर खटला दाखल करून मोठ्या नुकसानीची मागणी केली आहे.


प्रत्यक्षात 2 YouTubers तलावात एकत्र स्टंट करत होते. त्यापैकी एक तरुण बुलडोझरच्या बादलीला लटकत होता, तर दुसरा मशीन चालवत होता.


बुलडोझर चालवणाऱ्या व्यक्तीने बादलीला लटकलेल्या व्यक्तीला फिरवायला सुरुवात केली. यादरम्यान बादलीला लटकलेली व्यक्ती बुलडोझरच्या बादलीच्या टोकावर आदळली. त्यात तो गंभीर जखमी झाला.


बुलडोझर चालवणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचे नाव डेव्हिड डोब्रिक आहे. जेफ विटेक असे जखमी युट्यूबरचे नाव आहे. ज्यासाठी जेफने आता डेव्हिडवर गंभीर आरोप केले आहेत आणि त्याच्याकडून सुमारे 80 कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.



खटल्यात जेफने सांगितले की हा व्हिडीओ डेव्हिडच्या 'सोशल मीडिया कमबॅक'साठी शूट केला जात आहे, टीएमझेडने वृत्त दिले आहे. त्यासाठी ते अमेरिकेतील उटाह तलावावर गेले.


जेफने दावा केला की डेव्हिडने त्याच्या साथीदारांना सांगितले की, तो बुलडोझरच्या बादलीतून टांगलेली दोरी पकडेल आणि तो त्यांना बुलडोझरभोवती फिरवेल.


परंतु पुढे जेफने सांगितले की, जेव्हा त्याची पाळी आली तेव्हा डेव्हिडने वेग वाढवला. डेव्हिडच्या हे लक्षात येताच त्याने अचानक बुलडोझरचा वेग कमी केला. यामुळे जेफचा अपघात झाला आणि तो गंभीर जखमी झाला.



जेफने यापूर्वी या घटनेबद्दल सांगितले होते की, या घटनेमुळे त्याचा पाय आणि तोंडाला लागले आहे. जेफच्या तोंडाला इतकं लागलं की, त्याची कवटी फाटली होती. तसेच त्याने आपला एक डोळा जवळपास गमावल्याचेही सांगितले. परंतु सर्जरीनंतर तो चांगला झाला आहे. त्याने त्याचा आधीचा आणि आताचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.


या घटनेमुळे आपले मोठे नुकसान झाल्याचे जेफने सांगितले. त्यांचा पगार कमी झाला आहे, कमाईची क्षमता कमी झाली आहे आणि त्यांच्या उपचारांवर त्यांना मोठा खर्च झाला आहे.