ट्रेन आणि कारचा भीषण अपघात... ड्रायव्हरसाठी ठरला चमत्कार, पाहा फोटो
कारची अवस्था पाहून तुम्ही विचार कराल की, याच्या आत बसलेली व्यक्ती वाचनं काही शक्य नाही.
मुंबई : वाहनांचे अपघात हे खूप भयानक असताता. यामुळे काही वेळा आपली चूकी नसताना काही लोकांना आपले प्राण गमवावे लागतात, तर काही लोकं जखमी होतात. बऱ्याचदा आपण अपघात झालेल्या वाहनाची परिस्थीती पाहून अंदाजा लावतो की, आत बसलेल्या व्यक्तीची काय अवस्था झाली असावी. कारचा जर चुरा झाला असेल तर त्यात असलेल्या लोकांची वाचण्याची शक्यता फार कमी असते. मोठ्या अपघातातून फार कमी लोकं वाचताता आणि जे वाचतात ते फार नशीबवान असतात.
सध्या ब्रिटनमधील एका अपघाताचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कारची अवस्था पाहून तुम्ही विचार कराल की, याच्या आत बसलेली व्यक्ती वाचनं काही शक्य नाही. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या का कारमधील व्यक्तीचा जीव वाचला आहे.
ब्रिटनमध्ये झालेला हा अपघात गाडी आणि ट्रेनमध्ये झाला आहे. ट्रेनसमोर एक गाडी आली. ज्यामुळे ट्रेन आणि कारची जबरदस्त टक्कर झाली. पण चमत्कार असा झाला की ही गाडी चालवणाऱ्या महिलेचा जीव वाचला. त्यामुळे असेच म्हणावे लागेली की, 'देव तारी त्याला कोण मारी'.
मीडिया वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाला. रेल्वे क्रॉसिंगजवळ महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले होते. ही घटना एसेक्समध्ये घडली आहे. तिथे रस्त्यावर खूप बर्फ होता. ज्यामुळे गाडी घसरु लागली आणि या महिलेला ही कार थांबवता आली नाही.
अपघातातून वाचलेल्या या महिलेचं नावं सँड्रा रोस्को आहे. तिने सांगितले की, ती ट्रॅकच्या आधी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र बर्फवृष्टीमुळे गाडी पुढे रेल्वे रुळावर गेली.
सँड्राने सांगितले की, कार तिथे थांबताच ट्रेन आली. हे सर्व फार लवकर घडले. तिने तिच्या उजवीकडे पाहिलं तर ट्रेन गाडीच्या दिशेने जात होती. ती लगेच गाडीतून उतरली. तेवढ्यात ट्रेन थेट कारला धडकली. ट्रेनची कारला इतकी धडक बसली की कार स्वतःहून रुळावरून घसरली. संपूर्ण मागील भागाचा चुरा झाला.
सँड्रा सांगते की, सर्व काही इतक्या लवकर घडले की तिला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. हे दृश्य पाहून आजूबाजूला उभे असलेले लोकही घाबरले. कार बर्फावर घसरल्याने ही टक्कर झाल्याचे अपघात कमांडर डेव्ह बाँड यांनी सांगितले. या धडकेमुळे अनेक गाड्यांना उशीर झाला. त्यानंतर अनेक तास हा रस्ता बंद होता.