हिमनग वितळल्याने जगात पसरणार महाभयंकर विषाणू? कोरोना यासमोर काहीच नाही?
आता हा करोनाचा त्रास कुठे जातोय तर आता जगावर नव्या संकटांची चाहूल लागली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा प्राण्यांपासून हा रोग आला असल्याचे सिद्ध झाले परंतु आता जगावर करोनापेक्षाही भयंकर विषाणूचं सावट आहे. आणि हा विषाणू कुठल्या प्राण्यापासून किंवा पक्षापासून येत नसून हा विषाणू चक्क हिमनगांमधून येतो आहे. हिमकड्यांमधून या विषाणूचा फैलाव होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.
New Pandemic in the World: मागच्या वर्षीपर्यंत करोनो विषाणूनं (Corona Viras) जगात हाहाकार माजवला होता त्यातून करोनाच्या नव्या व्हेरियंटवरूनही सगळीकडेच चितेंचे वातावरण होते. अनेकांचे या करोना महामारीत जीव गेले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक परिस्थिती मोठा धक्काही बसला आहे. या सगळ्याच नकारात्मक परिस्थितीमुळे सगळीकडेच चिंता पसरली होती. (dangerous virus might spread in the world after glaceries melt)
आता हा करोनाचा त्रास कुठे जातोय तर आता जगावर नव्या संकटांची चाहूल लागली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा प्राण्यांपासून हा रोग आला असल्याचे सिद्ध झाले परंतु आता जगावर करोनापेक्षाही भयंकर विषाणूचं सावट आहे. आणि हा विषाणू कुठल्या प्राण्यापासून किंवा पक्षापासून येत नसून हा विषाणू चक्क हिमनगांमधून (Melting Glaceries) येतो आहे. हिमकड्यांमधून या विषाणूचा फैलाव होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
एका नव्या वृत्तातून आणि अभ्यासातून असे समोर आले आहे की हिमकड्यांच्या खालीही अनेक जिवाणू आणि विषाणू लपून बसलेले आहेत. आणि ते पसरल्यास आपल्या ग्रहावर करोनानंतर महाभयंकर संकट येणार आहे. हा विषाणू समुद्रामार्ग पसरू शकतो आणि हा पहिल्यांदा प्राण्यांमध्ये शिरकाव करेल आणि मग तो संपुर्ण मानवी जातीत पसरेल, असे कळते आहे.
शास्त्रज्ञांनी नुकताच आर्टिक सर्कलच्या (Artic Circle) उत्तरेला असलेल्या लेक हेजेनचा अभ्यास केला गेला आहे. या परिसरातल्या काही भागांची चाचणी करण्यात आली आहे. त्यातील डीएनए आणि आरएनए काढण्यात आला आहे. त्यावर सध्या संशोधन सुरू आहे. यातून हे समोर आले आहे या हिमनगातील विषाणू फारच धोकादायक आहेत आणि ते फार कमी कालावधीत माणसांपर्यंत पाहचू शकतात.
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
जागतिक तापमान वाढ (Climate Change) आणि वातावरणातील बदलांमुळे हिमकडे वितळत आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या हिमकड्यांच्या खाली अनेक वर्षांपासून विषाणू आणि जीवाणू आहेत. प्रजननाच्या माध्यमातून त्यांची संख्या वाढत असून आर्टिकच्या बर्फाळ प्रदेशात तलाव आहेत. हे तलाव जीवाणू आणि विषाणूंचं प्रजनन केंद्र आहेत अशी माहिती कळते.