मुंबई : नोकरीच्या ठिकाणी कोणा एका व्यक्तीच्या प्रेमात पडायचं की नाही, याविषयी प्रचंड दुमत आहे. काहींना हे योग्य वाटतं, तर काहीजण मात्र याच्या विरोधात दिसतात. पण, एक मुद्दा मात्र नक्की की नोकरीच्या ठिकाणी प्रेमप्रकरणं वगैरे करताना सावधगिरी बाळगणं कधीही उत्तम. (Date with Colleague tricks and tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरीच्या ठिकाणी फक्त काम म्हणजे काम... 
कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त तुम्ही कुठंही फिरा, कितीही वेळ एकमेकांसोबत व्यतीत करा. पण, कामाच्या ठिकाणी मात्र हयगय नको. खासगी गोष्टींचा कमीत कमी परिणामही तुमच्या कामावर होता कामा नये. 


अबोल्याचं प्रदर्शन नको 
सहाजिकच प्रेम आहे तिथं मतभेद येणार, अबोलाही येणारच. पण, एकाच ठिकाणी नोकरी करत असल्यास तिथं या गोष्टीचं जाहीर प्रदर्शन नको. अशानं कार्यालयीन वेळात नकारात्मकता फोफावते आणि कामावरून लक्ष विचलित होतं. 


नात्याची जाहिर कबुली नकोच 
जेव्हा तुम्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असता, अशा वेळी सहकाऱ्यांशी ही बाब शेअर करणं तुम्हाला पसंत पडतं. त्यातही एकाच ठिकाणी आपलं माणुस असतानातर ही गोष्ट कोणाला सांगू आणि कोणाला नको, असं होतं. पण, असं होऊन देऊ नका. शक्य तितक्या गोष्टी गुलदस्त्यातच ठेवा. 


ईमेल चुकूनही करु नका 
नोकरीच्या ठिकाणी आपलं प्रेमाचं माणूस रुसलं किंवा रागावलेलं असताना एखादा मेसेज करणं स्वाभाविक आहे. किंवा नुसतंच बोलत राहणंही स्वाभाविक आहे. पण, असं होऊन देऊ नका. किंबहुना ऑफिसच्या अधिकृत पोर्टलवरून तर अजिबातच संवाद साधू नका. 


प्रेम वगैरे सर्व ठीक. पण, नोकरीच्या व्यतिरिक्त मिळणारा वेळ या गोष्टींसाठी राखीव ठेवा. तरच तुम्हाला नोकरी आणि प्रेमात योग्य समतोल राखता येईल.