Dawood Ibrahim Second Marriage: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने दुसरं लग्न केलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) (NIA)तपासणीदरम्यान ही माहिती समोर आली आहे. एनआयएला ही माहिती दाऊदच्या एका नातेवाईकाने दिली आहे. एकीकडे दाऊदने दुसरं लग्न केल्याची माहिती समोर येत असतानाच त्याने पहिल्या पत्नीला म्हणजे महजबीला घटस्फोट दिलेला नाही असंही या नातेवाईकाने सांगितलं आहे.


नातेवाईकाने दिली माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) तपासामध्ये अशी माहिती समोर आली आहे की दाऊदची (Dawood Ibrahim) दुसरी पत्नी ही पाकिस्तानी पठान समुदायामधील आहे. एनआयला दाऊदच्या दुसऱ्या  लग्नासंदर्भात दाऊदच्या नातेवाईकानेच माहिती दिली असल्याने ही माहिती खरी असल्याचं समजतं. मात्र या व्यक्तीने दाऊदची ही दुसरी पत्नी कुठे राहते आणि नेमकं लग्न कधी झालं याबद्दलची माहिती दिली नाही. 1955 साली जन्मलेला दाऊद सध्या 67 वर्षांचा आहे. 


घरचा पत्ताही बदलला


एएनआयच्या (NIA) तपासामध्ये असाही खुलासा झाला आहे की दाऊदने (Dawood Ibrahim)  आपलं राहतं घरही बदललं आहे. दाऊदच्या घरचा पत्ताही बदलला असून तो आता डिफेन्स एरियामध्ये स्थायिक झाला आहे. तपास यंत्रणांना मिळेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच दाऊद नव्या घरात रहायला गेला आहे. सध्या तो कराचीमध्ये पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाशी संबंधित परिसरामध्ये वास्तव्यास आहे.


हे ही वाचा >> "भारताविरोधात तीन युद्धं लढल्याने..."; मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी PM चं मोठं विधान


1993 पासून वॉण्टेड


दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) भारतामधील मोस्ट वॉण्टेड आरोपींपैकी एक आहे. सन 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील तो प्रमुख आरोपी असून या बॉम्बफोटांनंतर तो पाकिस्तानमध्ये पळून गेला. मात्र पाकिस्तानने कायमच दाऊद पाकिस्तानात राहत नाही असा दावा केला आहे. असं असलं तरी दाऊदच्या पाकिस्तानमधील वास्तव्याबद्दलचे अनेक पुरावे मागील तीन दशकांमध्ये समोर आले आहेत.


मियाँदादची मुलगी दाऊदची सून


दाऊद (Dawood Ibrahim) आणि त्याची पत्नी महजबी यांची मुलगी माहरुखचं लग्न पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद (Javed Miandad) यांचा मुलगा जुनैदबरोबर झाला आहे. काही वर्षांपूर्वी हे लग्न पाकिस्तानमध्ये पार पडलं होतं. तर रिसेप्शन दुबईमध्ये झालं होतं.