लंडन: दहशतवादी कारवाया आणि इतर अनेक गुन्ह्यांत मुंबई पोलिसांना हव्या असलेल्या गुन्हेगारांचा म्होरक्या, देशविघात कृत्यांचा मास्टरमाईंड गुंड दाऊद इब्राहीमला जोरदार दणका बसला आहे. दाऊदचा अत्यंत निकटचा सहकारी जबीर मोती याला लंडमध्ये अटक करण्यात आली आहे. लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी हिल्टन हॉटेलमधू त्याला शुक्रवारी अटक केली. अटक केल्यावर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.


अत्यंत निकटचा आणि तितकाच विश्वासू सहकारी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जबीर मोतीकडे पाकिस्तानचे नागरिकत्व असून, तो, दाऊदचा अत्यंत निकटचा आणि तितकाच विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जातो. मोती हा दाऊदचे इग्लंड, यूएई आणि इतर देशातील व्यवहार सांभाळत असे. तो केवळ दाऊदचाच विश्वासू नव्हता. तर, दाऊदची पत्नी महजबीसुद्धा जबीरवर विश्वास ठेवत असे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद कराची येथील क्लिप्टन परिसरात राहतो. मोती याच्यावर अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी आणि इतर काही गुन्ह्यांचे आरोप आहेत. त्याला अटक करावी अशी अपील भारताकडून करण्यात आली होती.


दहशतवादी कारवायांसाठी कमाई


सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दाऊदच्या संपत्तीतून मिळालेली आर्थिक कमाई ही दहशतवादी कारवायांसाठी वापरली जात असे. दाऊदसाठी मोती बनावट भारतीय चलनाची निर्मिती करत असे. तसेच, तो अवैधरित्या शस्त्रपूरवठा, संपत्ती, व्यवसाय आदी गोष्टींची जबाबदारीही सांभाळत असे. दाऊदच्या कुटुंबियांना इग्लंडला नेण्याची जबाबदारीही त्याच्यावरच सोपविणयात आली होती.  मोतीच्या नावे कराचीत मोठी मालमत्ताही आहे. 


जबीर मोती हा अँटीगुआ आणि डेमिनिक रिपब्लिकचे नागरिकत्व घेण्याच्या तसेच, हंगेरीत कायमचे वास्तव्य करण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्याजवळ ब्रिटनमध्ये राहण्याचा १० वर्षांचा व्हिसा होता.