Dead wifes message on Tinder: मृत व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज आला तर तुमची अवस्था काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अशावेळी बहुसंख्य लोकांना मोठा धक्का बसू शकतो. यातून सावरणे कठीण जाईल. एखादे भुताटकीचे प्रकरण असेल असे अनेकांना वाटू शकते. ब्रिटनमध्ये एका इसमाला अशा धक्कादायक प्रसंगातून जावे लागले.
आपण टिंडरवर आपल्या मृत पत्नीशी बोललो असा दावा त्याने केला आहे. डेरेक असे या तरुणाचे नाव असून त्याच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. टिंडरवर आम्ही दोघांनी खूप वेळ संवाद साधल्याचे तो सांगतो. काय आहे हे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेरेक याने घोस्ट हंस पॉडकास्टवर त्याच्यासोबत घडलेली कथा शेअर केली आहे. आता या घटनेला अनेक दिवस उलटले असले तरी जेव्हा घटना घडली तेव्हा आपण खूप अस्वस्थ झालो होतो, असे त्याने सांगितले. मृत झाल्यानंतर संवाद साधणाऱ्या बायकोची कहाणी कोणाला सांगावी हे आपल्याला समजत नव्हते, असे तो सांगतो. डेली मेलने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 


लंडनमध्ये राहणाऱ्या डेरेकला वाटते की त्याने आपल्या पत्नीशी टिंडरवर संवाद साधला आहे. त्यांच्या पत्नीला गर्भाशयाचा कर्करोग होता. तिच्या मृत्यूला दोन वर्षे झाली होती. एके दिवशी त्याने टिंडरवर एक प्रोफाईल पाहिले. प्रोफाइल त्याच्या मृत पत्नीचे होते. तिच्या अकाऊंटला तीन फोटो होते. हे फोटे डेरेकने आधी कधी पाहिले नव्हते. 


पत्नीने घराबाहेरुन दार ठोठावले


डेरेकने टिंडरवर राईट स्वाइप केले आणि काय होईल याची वाट पाहत राहिला. डेरेकला टिंडरवर कधी कोणते मॅच सापडले नव्हते हे आता घडणारी घटना त्याच्यासोबत पहिल्यांदाच घडत होती. हा विनोद असू शकतो, असे डेरेकला सुरुवातीला वाटले. आपल्या पत्नीच्या नावाने बनावट खाते तयार करुन कोणीतरी छेडत असल्याचे त्याला वाटले. 


मग सकाळी त्याला हॅलो असा मेसेज आला. त्यावर हे फोटो माझ्या पत्नीचे आहेत? तुम्हाला हे कुठून मिळाले? असे डेरेकने विचारले. यावरकाही वेळाने रिप्लाय आला, तू घरी आहेस का? मी बाहेर उभी आहे, मला आत येऊ द्ये. यानंतर माझा श्वासच कोंडला असे डेरेकने सांगितले. 


'डेरी लवकरच टिंडरवर आलास'


पत्नीच्या अकाऊंटवरून मला टोमणे मारण्यात आल्याचे तो सांगतो. मला घराचा दरवाजा बंद झाल्याचे जाणवले. मी घाबरले आणि बेडवर पडलो. टिंडरवर खूप लवकर आलास डेरी असा मेसेज आल्याचे त्याने सांगितले. डेरी हे नाव पत्नी व्यतिरिक्त इतर कोणालाही माहित नव्हते, असेही त्याने सांगितले. 


पतीने माफी मागितल्यावर प्रोफाइल गायब


यानंतर पती डेरेक चांगलाच घाबरला आणि त्याने आपल्या मृत पत्नीची माफी मागितली. आता आयुष्यात पुढे जायचे आहे, असे त्याने सांगितले. तो बेडरूममधून बाहेर पडला, बाहेर बघितले आणि परत घरात आला. घरी परतल्यावर त्याला काहीच दिसले नाही. कोणीही माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही पण हे माझ्यासोबत घडलंय असे डेरेक सांगतो. 


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)