वॉशिंग्टन : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी (Death Anniversary of Mahatma Gandhi)अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियात महात्मा गांधी यांच्या अपमानाची बातमी समोर येतेय. काही अज्ञातांनी पार्कमधील महात्मा गांधी यांचा पुतळा तोडला. या घटनेचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकन नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर कॅलिफोर्नियाच्या डेविसमधील सेंट्रल पार्कमध्ये गांधीच्या पुतळ्याच्या गुडघ्यावर घाव घालत तोडण्यात आलंय. मुर्तींच्या अर्ध्या चेहऱ्याला नुकसान पोहवण्यात आलंय. तर अर्धा चेहरा गायब आहे. ही मुर्ती 6 फूट उंच असून तिचे वजन 294 किलोग्रॅम इतके आहे. काही महिन्यांपुर्वी गांधीजींच्या पुतळ्याचे नुकसान करण्याची घटना अमेरिकेत घडली होती. याप्रकरणी सखोल चौकशी केली जावी अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केलीय. 



महात्मा गांधींची मुर्ती तोडणाऱ्या अज्ञाताचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. यामागचे कारण शोधले जात आहे. डेविस शहरातील सेंट्रल पार्कमध्ये 4 वर्षांपुर्वी महात्मा गांधींची मुर्ती लावण्यात आली होती. या विभागात महात्मा गांधी आणि भारत विरोधी संघटनांचे आंदोलन सुरु होते.