Deer Snake Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शाकाहारी प्राणी असलेला हरिण अचानक साप खाताना (Deer Swallowing Snake Viral Video) दिसत आहे. हरणाला साप खाताना पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हरणाला आपण नेहमी गवत चरताना पाहतो. अभयारण्यात तुम्ही हरण पाहिले असेल तर नेहमी शांत व घाबरट अशीच वृत्ती दिसेल. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओ पाहून हा एक अशुभ संकेत असल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एक हरिण साप चावून खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारतीय वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहिल तेव्हा त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत निसर्गाला अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी कॅमेरा आपली मदत करत आहे. वनस्पतीजीवीदेखील कधी-कधी साप खाऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. काही ठिकाणी आजारी असलेल्या उंटांना किंग कोब्रासारखे विषारी साप खायला देतात. साप खाल्ल्याने त्यांची प्रकृती स्थिर होते, असं म्हटलं जातं. मात्र, हरणाची ही बदललेली सवय चांगला संकेत नसल्याचं म्हटलं जातंय. कारण शाकाहारी असलेला हरिण मांसाहारी पदार्थ खात असेल तर अन्नसाखळीत बदल होऊ शकते. अन्नसाखळीनुसार एकमेकांवर अवलंबून असतात तो क्रम बदलू शकतो, असं मानलं जातं 


सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रत्येकानेच ही घटना विचित्र असल्याचं म्हटलं आहे. यावेळी अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. एका ट्विटर युजरने म्हटलं आहे की निसर्गात अविश्वसनीय आणि अजब गोष्टी आहेत. जगण्यासाठी जनावराच्या वागण्यातही बदल होताना दिसत आहे, हेच हा व्हिडिओ दाखवतो. तर, एका ट्विटर युजरने म्हटलं आहे की, वेळ जशी जशी बदलत जाते तशा सवयींमध्येही बदल घडत आहेत. तर अनेकांनी यावर चिंता व्यक्त करत अन्नसाखळींमध्ये बिघाड झाला आहे, असं म्हटलं आहे. माकडांच्या काही प्रजातीही हल्ली मांस खाऊ लागल्या आहेत, असंही काहींनी निदर्शनास आणून दिलं आहे. 



व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी हरणाला भूक असह्य झाल्यामुळं त्याच्यावर साप खाण्याची वेळ आली. हरिण हे निसर्गाच्या इकोसिस्टमचा प्रमुख भाग आहे. जर त्याने त्याच्या खाण्याच्या सवयी बदलल्या असतील तर निसर्गासाठी ही मोठ्या धोक्याचा पूर्वसंकेत असून शकतो. यामुळं जंगलाची व्यवस्था बिघडू शकते, असा दावा करण्यात येत आहे. 


हरिण फक्त गवत-चारा याव्यतिरिक्त मशरुम, फूल, भुईमूग, आक्रोड इत्यादी पदार्थ मोठ्या आवडीने खातात.