नवी दिल्ली : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (who) चे डायरेक्टर जनरल टेड्रोस एडहानॉम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा विनाशकारी उद्रेक होण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सोमवारी सांगितले की, व्हायरसचे नवीन रूप लोकांमध्ये लवकर संक्रमित होत आहे.


मृत्यू पुन्हा वाढले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेड्रास यांनी जिनेव्हा येथील पत्रकार परिषदेत म्हटले की, 'जगातील कोविड प्रकरणात दहा आठवडे घट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण 4 आठवड्यांपासून वाढू लागले आहेत. या व्यतिरिक्त मृत्यूंमध्येही पुन्हा वाढ होत आहे. डेल्टा प्रकार संपूर्ण जगात वेगाने पसरत आहे, ज्यामुळे पुन्हा मृत्यू आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. कोरोनाचा हा डेल्टा प्रकार आतापर्यंत जगातील 104 देशांमध्ये सापडला आहे.


निर्बंध कमी केल्यास मोठा धोका


डेल्टा प्रकारामुळे बर्‍याच देशांना पुन्हा कोविड निर्बंध वाढवावे लागले आहेत. फ्रान्सने नवीन निर्बंध लादले आहेत. ब्रिटनसारखे काही देश आहेत ज्यांनी बंदी उठवण्याचा विचार केला आहे. डब्ल्यूएचओ चीफ यांनी सुरक्षा उपाय शिथिल केल्यामुळे संपूर्ण जगाला होणार्‍या धोक्याविषयी इशारा दिला आहे.


ते म्हणाले, 'जगातील देशांची सध्याची सामूहिक रणनीती मला अग्निशमन दलाच्या जंगलातील आगीशी लढणार्‍या संघासारखी वाटते. यामध्ये एका भागाच्या आगीवर नियंत्रण ठेवले जाते. पण दुसऱ्या ठिकाणी पुन्हा ठिणगी पढते आणि आग पसरते. टेड्रोस यांनी सर्व देशातील सरकारांना एकमेकांना लस पुरवण्य़ाचं आणि एकत्र येऊन साथीच्या विरूद्ध लढा देण्याचं आवाहन केलं आहे.