मुंबई : अवकाशातली सगळ्यात मोठी दुर्बीण बिघडली आहे. तब्बल ११ टन वजनाची हबल दुर्बीणीचं काम सध्या थांबवण्यात आलं आहे. हबलच्या जायरोस्कोपमध्ये बिघाड झाल्यामुळं ही दुर्बीण आता सेफ मोडमध्ये ठेवण्यात आली आहे. हबलवर नियंत्रण ठेवणाऱ्या अमेरिकी कक्षातून सध्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.


पृथ्वीपासून ५३७ किलोमीटर लांब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जायरोस्कोपमध्ये बिघाड झाल्यामुळं ही दुर्बीण हव्या त्या दिशेनं ठेवणं अवघड झालं आहे. ही दुर्बीण पृथ्वीपासून सुमारे ५३७ किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा घालते. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी संयुक्तरित्या हबलची निर्मिती करत २४ एप्रिल १९९० ला ही दुर्बीण प्रक्षेपित केली होती. 


आतापर्यंत सहा वेळा दुरुस्ती 


हबलनं आजवर अवकाशातील ग्रह, तारे, आकाशगंगा, धुमकेतू यांची असंख्य उत्कृष्ट छायाचित्रं घेतली आहेत.  अनंत अवकाशाचा नकाशा उलगडून दाखवण्याचे काम हबलने केले आहे. त्यामुळं अवकाश समजायला मदत झाली आहे. आतापर्यंत सहा वेळा अवकाशात जाऊन हबलची दुरुस्ती करण्यात आली आहे. जगातील खगोल शास्त्रज्ञ, हौशी खगोल अभ्यासक या सर्वांचे लक्ष आता हबलकडे लागले आहे.