मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरस चीनने तयार केलेलं जैविक हत्यार असल्याचा आरोप काही देशांनी केला आहे. तर काही देश हे अमेरिकेचं षडयंत्र असल्याचा दावा करत आहेत. पण कोरोना व्हायरसविषयी रशियाला आधीपासूनच कल्पना होती का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. सेटेलाईट फोटोंवरून रशियाने आधीपासूनच याची तयारी केल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाने मॉस्कोच्या जवळ ९२ मिलियन पाऊंड खर्च करुन हॉस्पिटल बांधण्याचं काम सुरू केलं होतं. एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल लागल्यामुळे रशियाने एवढ्या मोठ्याप्रमाणावर हॉस्पिटल बांधण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. या तयारीचे Maxar ने फोटो घेतले आहेत.



मागच्या वर्षी ११ नोव्हेंबरला घेतलेल्या या फोटोमध्ये बहुतेक ठिकाणी शेत दिसत आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसची लागण व्हायच्या एक महिना आधीचा हा फोटो आहे. 



२८ फेब्रुवारी २०२० म्हणजेच ३ महिन्यानंतर घेण्यात आलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये शेतांना जाळून तिकडे मोठ्या प्रमाणावर यार्ड बनवण्याचं काम सुरू असल्याचं दिसतं.



१५ मार्च २०२० ला घेण्यात आलेल्या फोटोमध्ये बऱ्याच क्रेननी काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.



३१ मार्च २०२० ला Maxarने घेतलेल्या फोटोतून हॉस्पिटलचं काम जोरात असल्याचं दिसत आहे.



पहिल्या रुग्णालयाचं बांधकाम सुरू असताना रशियाने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ५०० बेडचं दुसरं हॉस्पिटल बांधल्याचं सांगितलं. रशियामध्ये आता कोरोनाशी लढण्यासाठी २ रुग्णालय असतील. रशियामध्ये सध्या कोरोनाचे १ हजार रुग्ण आहेत. मॉस्कोमध्ये या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.