पाकिस्तान : पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या कन्या आणि उद्योगपती नुसली वाडियांच्या मातोश्री दिना वाडिया यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या.  


वाडिया कुटुंबानं याविषयी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. वाडीयांच्या मागे त्याचे पुत्र नुसली आणि मुलगी डायना तसच नेस आणि जेह ही नातवंड असा मोठा परिवार आहे.
 मुंबईतल्या जिना हाऊसमध्ये शेवटचे दिवस व्यतित करण्याचा दिना वाडिया यांचा मानस होता. 
 २०१० मध्ये वा़डिया कुटुंबानं मुंबई उच्च न्यायालयात जिना हाऊसचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज केला होता.  पण दिना वाडियांची ही इच्छा अपूर्णच राहिली