बाबो...! सात लाख रुपये, जगभरात कुठेही जाण्यासाठीचं विमान तिकीट; `या` कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी
कर्मचाऱ्यांना आश्चर्यचकित करणारं गिफ्ट
वॉशिंग्टन : दिवाळी तोंडावर आलेली असतानाच प्रत्येक कंपनीतील कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागून राहते ती म्हणजे त्यांना कंपनीकडून मिळणाऱ्या दिवाळी गिफ्टची. दिवाळी म्हटलं की, पगारासोबतच येणाऱ्या बोनससह दिवाळीचे धमाकेदार गिफ्ट कंपनी कर्मचाऱ्यांना देते. यामध्ये मग कोणी सुकामेवा देतं, कोणी महागडे चॉकलेट्स, डिनर सेट, वेसल सेट असं बरंच काही देतं. पण, एका कंपनीकडून या सर्व मर्यादा ओलांडत कर्मचाऱ्यांना आश्चर्यचकित करणारं गिफ्ट देण्यात आलं आहे.
अर्थात हे दिवाळी गिफ्ट नसून, कर्मचाऱ्यांना चांगल्या कमासाठी दिलेली ही पोचपावती आहे.
Spanx या महिलांच्या अंतरवस्त्रांच्या ब्रँडसाठी सीईओ म्हणून काम पाहणाऱ्या Sarah Blakely यांनी व्यवसायात मिळालेलं यश साजरा करण्यासाठी एक खास मार्ग निवडला.
कंपनीला घालेल्या घसघशीत फायद्यामुळं Sarah Blakely यांनी त्यांच्या 500 कर्मचाऱ्यांना एका पार्टीमध्ये सरप्राईज दिलं.
पृथ्वीची प्रतिकृती असणारा एक गोळा फिरवत त्यांनी कर्मचाऱ्यांना सरप्राईजचे संकेत देण्याता प्रयत्न केला.
त्यांनी जाहीर केलं, की कर्मचाऱ्यांना त्यांना जगभरात जिथे जायचंय त्या ठिकाणासाठी फर्स्ट क्लास विमान तिकीट कंपनीतर्फे प्रत्येकी दोन विमान तिकीटं देण्यात येणार आहेत.
Sarah Blakely यांच्या या सरप्राईजचा आनंद परमोच्च शिखरावर असतानाच त्यांनी आणखी एक धक्का दिला.
विमानाच्या तिकीटांसोबतच कर्मचाऱ्यांना त्य़ा प्रत्येकी 10 हजार युएस डॉलर, म्हणजे भारतीय प्रमाणानुसार 7 लाख 49 हजारांहूनही अधिक रक्कम देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी मिळालेल्या या खास गोष्ची पाहता खऱ्या अर्थानं त्यांची दिवाळीच झाली असं म्हणायला हरकत नाही. हे म्हणजे मोठ्या मनाचा बॉस असण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, इथं तर स्वप्नही साकार झालं आणि बॉसकडून सरप्राईजही मिळालं असंच काहीसं झालं आहे.