Cow On Bike Video : सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसून येतो आहे. दारोदारी रांगोळी, कंदील आणि दिव्यांनी अख्ख दुनिया प्रकाशमय झाली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर गोवर्धन पूजा करण्यात येते. यात गोवर्धन पर्वत आणि गायीची पूजा केली जाते. सोशल मीडियावरही दिवाळीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात एक मजेशीर व्हिडीओ सर्व इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने गायीला दिवाळी गिफ्ट दिलं आहे. आजपर्यंत आपण श्वान, शेळ्या आणि मांजर यांना कार आणि बाइकवरुन फिरताना पाहिलं आहे. पण तुम्ही कधी गायीला कधी छोट्याशा बाइकवरुन फिरताना पाहिलं का?  (Diwali gift to cow man made a bike ride to Gomate the video went viral trending now)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाइकवरुन गायीला फिरणं कधीच आपण विचारही करु शकत नाही. खरं तर गायीला बाइकवर फिरण्याचा धोका पत्करत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील एका व्यक्तीचा कारनामा पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात मारला आहे. या व्यक्तीने गायीला दिवाळी गिफ्ट दिलं आहे. तिला बाइकवरुन त्याने बाइक राइड दिली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,  एक गायीला त्याने बाइकच्या पुढील सीटवर बसवलंय आणि तो स्वतः मागे बसलेला दिसत आहे.


गाय समोर बसली असली तरी तो व्यक्ती रस्त्यावरून बाइक चालवताना दिसून आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रवासात गायीने आपल्या मालकाला अजिबात त्रास देताना दिसत नाही. या बाइक राइडिंगच्या वेळी गाय अगदी शांतपणे बसून बाइक राइडची मजा घेताना दिसत आहे. तर या गायीने धावत्या बाइकवर हालचाल केली असती तर मोठा अपघात झाला असता आणि ते दोघे त्यात बळी ठरले असते. 


व्हिडीओ पाहून नेटकरी थक्कं 


गायीची बाइक राइड पाहून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कार चालकाने व्हिडीओ काढला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील everydayreelsday या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 



हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की, 'मला आश्चर्य वाटतं की त्या व्यक्तीने गायीला बाईकवर कसं बसवलं असेल?'  तर दुसरा म्हणाला की, 'गाय खूप शांत आहे.'