मुंबई : गरोदरपणाच्या काळात महिलांनी खूपच काळजी घेणं गरजचं असतं. मात्र, याच काळात एखाद्या महिलेने डान्स केला तर? आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे. सोशल मीडियात सध्या गरोदर महिलांनी केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.


(व्हिडिओज पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडिओत गरोदर महिला चक्क रुग्णालयातच डान्स करताना दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल की रुग्णालयात कसा डान्स केला? तर याचं उत्तर आहे डॉ. फर्नांडो ग्देस दा कुन्हा.


ब्राझीलमधील या डॉक्टरांचा दावा आहे की, गरोदरपणात डान्स केल्याने महिलांना होणारा त्रास कमी होतो. त्यामुळेच ते आपल्या पेशन्टला रुटीननुसार डान्स करण्यास सांगतात. 


गर्भवती महिलांना डॉक्टर डान्स शिकवतात आणि त्यानुसार महिला फॉलो करतात. इतकचं नाही तर, डॉ.य फर्नांडो स्वत: या महिलांसोबत डान्स करत असल्याचंही व्हिडिओत दिसतं. सोशल मीडियात युजर्स त्यांना डांसिंग डॉक्टर म्हणूनही ओळखतात.



गरोदरपणात डान्स केल्यास महिलांना होणारा त्रास कमी होतो आणि त्यांना बरं वाटतं. तसेच डिलिवरीही सहज होते. डॉ. फर्नांडो गरोदर महिलांसोबत डान्स करत असल्याचा व्हिडिओ सर्वातआधी ऑगस्ट महिन्यात व्हायरल झाला होता.


इंस्टाग्रामवर या डॉक्टरांना जवळपास ३३ हजार लोक फॉलो करतात. तर, युट्यूबवर त्यांच्या लेटेस्ट व्हिडिओला जवळपास दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.